शेगाव (जि. बुलडाणा): श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने दरवर्षी सार्जया होणार्या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून गुरुवारी दुपारपर्यंत एक हजाराच्यावर भजनी दिंड्यांचे संतनगरीत आगमन झाले. संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने ८ एप्रिलपासून राम जन्मोत्सव सोहळ्याचा प्रारंभ झाला. ११ एप्रिल रोजी रामायण स्वाहाकार यागाचा प्रारंभ ब्रह्मवृंदांच्या पौरहित्याखाली झाला. यावेळी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्यासह संस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ उपस्थित होते. उद्या शुक्रवारी सकाळी १0 वाजता रामायण स्वाहाकार यागाची पूर्णाहुती होणार आहे. १२ वाजता हभप विष्णूबुवा कवळेकर यांचे रामजन्मोत्सवाचे कीर्तन होईल. सकाळी राम जन्मोत्सवाचा पाळणा झाल्यानंतर श्रींची आरती व महाप्रसादाचे वितरण होणार आहे. दुपारी श्रींच्या पालखीची परिक्रमा होईल.
शेगावात एक हजारावर दिंड्या दाखल
By admin | Updated: April 15, 2016 02:19 IST