शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
4
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
5
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
6
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
7
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
8
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
9
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
12
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
13
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
14
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
15
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
16
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
17
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
18
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
19
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
20
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 

विद्युत जोडणीअभावी सिंचनाचे स्वप्न ‘पाण्यात’!

By admin | Updated: April 6, 2016 00:40 IST

शेतकरी त्रस्त; आठ हजार अर्ज प्रलंबित; कोटेशनची रक्कमही अडकली.

अकोला: राज्य शासनाने कृषिपंपाच्या विद्युत जोडणीचे अर्ज ३१ मार्च २0१६ पर्यंत निकाली काढण्याची घोषणा हवेत विरल्याचे आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत कृषिपंपाच्या वीज जोडणीचे तब्बल ८ हजार ३0९ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. कृषिपंपांना विद्युत पुरवठा मिळत नसल्याने शेतकर्‍यांचे सिंचनाचे स्वप्न तर ह्यपाण्यातह्णच गेले आहे, त्यांनी जोडणीसाठी भरलेली र क्कम (कोटेशन) देखील अडकून पडली आहे. गतवर्षी अल्प व अनियमित पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन समाधानकारक झाले नव्हते. मशागत व लागवडीसाठी शेतकर्‍यांनी कर्ज काढले, प्रसंगी संपूर्ण कुटुंबच शेतात राबले; मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे बहुतांश शेतकर्‍यांचा लागवड व मशागतीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे पाण्याची सोय असलेल्या शेतकर्‍यांनी रब्बी हंगामातील पिकांसाठी कंबर कसली. कृषिपंपासाठी विद्युत पुरवठा उपलब्ध होईल, या आशेवर राहिलेल्या शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडली.

असे काढले जात आहेत अर्ज निकाली..कृषिपंपाच्या विद्युत जोडणीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. वर्ष                 निकाली                      काढलेले अर्ज२0१0-११         २0५२२0११-१२         २८९२२0१२-१३         ३१६0२0१३-१४         १0८0२0१४-१५         १५९२२-१५-१६         ५000विद्युत जोडणीसाठी ८१९ कोटीविदर्भ व मराठवाड्यातील कृषिपंपांच्या विद्युत जोडणीसाठी गतवर्षी राज्य सरकारने ८१९ कोटी रुपये मंजूर केले. अकोला जिल्ह्यात ३१ मार्च २0१५ पर्यंत ७ हजार ६२१ अर्ज प्रलंबित होते. एप्रिल २0१५ ते मार्च २0१६ या कालावधीत पाच हजार अर्ज निकाली काढण्यात आले. त्यामुळे या शेतकर्‍यांच्या पिकांना पाणी मिळत आहे.सौरऊर्जाही ठरू शकते वरदानराज्य शासनाने राज्यात पाच लाख सौरऊर्जा पंपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या पैकी अकोला जिल्ह्यात सध्या १0 हजार पंपाचे उद्दिष्ट ठेवून कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. सौरऊर्जा पंपासाठी विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातूनही व्यवस्थित सिंचन करता येईल, असे कृषितज्ज्ञांचे मत आहे. महावितरणचे मागेल त्याला विजेचे उद्दिष्टविजेची मागणी दिवसेंदिवस वाढतच असून, प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी स्थानिक कंत्राटदारांना हाताशी धरून विद्युत जोडणीची प्रक्रिया महावितरणकडून पूर्ण करण्यात येत आहे. काही ठिकाणी पिके असल्याने खांब, रोहित्रासह इतरही साहित्य नेण्यास व कार्यान्वित करण्यात अडचणी येत असल्याचे महावितरणच्या अभियंत्यांचे म्हणणे आहे. अशा वेळी शेतकर्‍यांशी चर्चा करून समस्या निकाली काढण्यात येत आहे.