अकोला : एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात पाणलोटाची कामे सुरू असून, या कामात प्रचंड गैरव्यवहार होत असल्याचे समोर आले आहे. निंभोरा येथील एकात्मिक पाणलोट विकास समितीच्या सदस्यांनी त्यांच्या गावात झालेल्या बोगस कामांची यादीच तयार केली आहे. यात शेततळे, थातूरमातूर केलेले ढाळीचे बांध आदी कामांसह अंगणवाडी, शाळांना देण्यात आलेल्या खुच्र्यातही गैरव्यवहार झाल्याचा आरोप या समिती सदस्यांनी केला आहे. शेतातील पाणी शेतात जिरावे अर्थात मूलस्थानी जलसंधारणासाठी शासनाने राज्यात एकात्मिक पाणलोट विकास योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत अकोला तालुक्यातही विकास कामे सुरू आहेत. यात जलसंधारणासाठी शेतात ढाळीचे बांध करणे, शेततळे बांधणे, गावात सौर ऊज्रेवरील दिवे लावणे तसेच शाळांना फर्निचर देण्यात येत आहे. तथापि, निंभोरा-हिंगणा या गट ग्रामपंचायत असलेल्या गावातील कामे बोगस करण्यात आली आहेत, असा आरोप निभोंरा येथील संतोष भगत, पवन लांडे या एकात्मिक पाणलोट विकास समिती सदस्यांसह दिनेश लांडे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागितली असता, एका जुन्याच शेततळय़ाच्या नावावर रक्कम काढण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनात आले असून, उर्वरित पाच शेततळय़ाचे काम एकाच ट्रॅक्टरने अवघ्या पाच-पाच दिवसात केले असल्याचे दाखविण्यात आले आहे. शाळेला फर्निचर व अंगणवाड्यांना खेळाचे साहित्य देण्यात आले आहे; परंतु हे फर्निचर (डेक्स, बेंच ) प्रत्यक्षात हिंगणा तामसवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मिळालेच नाही. फर्निचर मिळाले नसल्याचे पत्र या शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिनेश लांडे यांच्या मागणीवरू न मुख्याध्यापकांनी त्यांना दिले आहे. या फर्निचरचे १ लाखाच्या वर देयक काढण्यात आले आहे. ढाळीच्या बांधाचा छेददर्शक आलेख अर्थात मॉडेल ठरलेले आहे. असे असताना चुकीच्या पद्धतीने या बांधाची थातूरमातूर कामे केली जात आहेत.
एकात्मिक पाणलोटाच्या कामात अपहार!
By admin | Updated: July 9, 2014 00:18 IST