शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मूर्तिजापुर तालुक्यात कोसळधारा; नदी- नाल्यांना पुर, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 17:31 IST

Heavy rain in Murtijapur taluka; पेढी, पुर्णा, कमळगंगा, उमा आणि काटेपूर्णा नदीसह- नाल्यांना प्रचंड पुर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. 

ठळक मुद्देमोठ्या प्रमाणात नुकसान अनेक गावांचा संपर्क तुटला 

-संजय उमक मूर्तिजापूर : ६ व ७ सप्टेंबर दरम्यानच्या रात्री तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली दरम्यान नदीला आलेल्या पुरामुळे  तालुक्यातील अनेक भागातील शेकडो  हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे तर पुरामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत.           तालुक्यातील  पेढी, पुर्णा, कमळगंगा, उमा आणि काटेपूर्णा नदीसह- नाल्यांना प्रचंड पुर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.  मुर्तिजापुर तालुक्यातील ऐंडली, पिंगला, झिंगला, खापरवाडा, लोनसणा, ताकवाडा, सोनोरी, बपोरी, गुंजवाडा, दातवी, गोरेगाव, समशेरपूर, गाजीपुर दताळा, भटोरी, मंगरुळ कांबे, या परिसरातील शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली आली तर यातील काही पिके खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोळासणाच्या दुपारपासूनच  संपुर्ण तालुक्यात पावसाने जोरदार ऐंट्री केली, एकंदरीत संपूर्ण पावसाळ्यातील हा दमदार पाउस झाल्याचे बोलल्या जाते या पावसामुळे नदी काठावरील संपूर्ण गावात पुराचे पाणी शिरल्याने गावातील घरांनांही त्याची झळ सोसावी लागली. या पावसाने पिकांना जिवनदान मिळाले असले तरी शेकडो हेक्टर वरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. तालुक्यात बहुतांश भागात यावर्षी पावसाच्या लहरीपणाचे दृश्य पहायला मिळाले. सुरुवातीला चांगला पाऊस होईल अशी आशा असतांना मात्र पावसाच्या अनियमीततेमुळे शेतकऱ्याच्या अपेक्षाभंग झाला. परिणामी शेतकऱ्यांची पेरणी व्यवस्था यावर्षी प्रभावीत होऊन तीन ते चार टप्प्यामध्ये पेरणी पुर्ण झाली आहे. असे असतांना मात्र  पोळा सणाच्या मध्यरात्री जोरदार पावसाचे आगमन झाल्याने प्रातिक्षेत असणाऱ्या पिकांना जीवनदान मिळालंय. तालुक्यातील काही भागात जोरदार तर काही गावात अति जोरदार पाऊस बरसला आहे.  अशातच अनेक गावात घरात पाणी शिरलय. शेलुबाजार, लोणसना, पिंगला, झिंगला, सोनोरी, बपोरी ही गावे पेढी, अंबाडा, पुर्णा या तीन नद्यांच्या संगमाचे वसलय असल्याने या नद्यांना पहाटेच्या सुमारास प्रचंड पुर आल्याने तालुक्यातील ४००   हेक्टरच्यावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.   तर तसेच धामोरी, कार्ली, जामठी, आकोली या गावातील नदीकाठच्या शेतातील पिकांचं मोठ नुकसान झालंय. कार्ली आणि धामोरी या गावांचा तर पुरामुळे तब्बल १८ तास तर गोरेगाव येथील कोराडी नाल्याने आणि जितापूर खेडकर येथील नाल्याने नागरीकांची अनेकतास वाट अडवून ठेवल्याने मूर्तिजापूर शहराशी या गावांचा संपर्क तुटला होता.ल्यामुळे अनेकांना पुर ओसरण्याची प्रतिक्षा लागली होती. अनेक दिवसापासुन तालुक्यातील पिकांना पावसााची असणारी पावसाची प्रतिक्षा तुर्तास मिटली असली तरी या वर्षीच्या पावसाळ्या मधला हा सर्वाधीक पाउस आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीच हा एक आशेचा किरण असतो पोळ्याच्या दिवशी आलेल्या पुरामुळे माझ्या सर्व जमिनीवरील पिके पातण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. हजारो रुपये शेतीवर खर्च करुन शेवटी हातात काहीच मिळाले नाही. झालेल्या संपूर्ण नुकसानीचा शासनाकडून मोबदला मिळावा.-अतुल आंबेकर, शेतकरी शेलू बाजार लाखपूरी मतदार संघात नदीकाठावरील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी व पुराच्या वेढ्यामुळे काही गावांचा संपर्क तुटल्याने नागरीक गावात अडकून पडले आहेत. त्यांची तातडीने मदत व पर्यायी व्यवस्था करावी-अप्पूदादा तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला