शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

३१ जुलैपर्यंत काढता येणार पीक विमा!

By admin | Updated: June 27, 2016 03:08 IST

योजनेचे स्वरूप बदलले : व-हाडातील शेतक-यांना पीक विम्याचा आधार!

बुलडाणा : १९९९ पासून सुरू असलेल्या ह्यराष्ट्रीय पीक विमाह्ण योजनेचे यावर्षी स्वरूप बदलले असून, २0१६-१७ च्या खरीप हंगामापासून ह्यप्रधानमंत्री पीक विमाह्ण योजना राबविण्यात येत आहे. यावर्षी शेतकर्‍यांना पीक विमा काढणे सोईचे व्हावे यासाठी ३१ जुलैपर्यंत पीक विमा योजनेची मुदत वाढविण्यात आली आहे. गत दोन वर्षांपासून दुष्काळात शेतकर्‍यांना पीक विमा योजना आधार ठरत असल्यामुळे यावर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेवर पश्‍चिम वर्‍हाडातील शेतकर्‍यांचा सर्वाधिक भर राहणार आहे. २0१६-१७ च्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणून राज्यभर राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार शेतकर्‍यांना बंधनकारक व बिगर कर्जदार शेतकर्‍यांकरिता ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. विमा संरक्षित रक्कम ही प्रत्येक पिकाच्या मंजूर कर्ज र्मयादेइतकी राहणार आहे. शेतकर्‍यांना भरावयाचा विमा हप्ता दर हा खरीप हंगामाकरिता २ टक्के, रब्बी हंगाम १.५ टक्के व नगदी पिकांकरिता ५ टक्के असा र्मयादित ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे यावर्षीपासून सुरू झालेली पंतप्रधान पीक विमा योजना शेतकर्‍यांसाठी चांगला आधार देणारी आहे. तसेच पूर, चक्रीवादळ, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, वीज कोसळणे, कीड व रोग इत्यादी टाळता न येण्याजोग्या कारणांमुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण मिळणार आहे. अपुरा, पाऊस, अतवृष्टी आदी संकटामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकर्‍यांना लाभ मिळणार आहे. पावसातील खंड, दुष्काळ यामुळे उत्पन्नामध्ये ५0 टक्केपेक्षा जास्त घट झाल्यास नुकसान भरपाईच्या २५ टक्केपर्यंत नुकसान भरपाईची आगाऊ रक्कम म्हणून देण्यात येणार आहे. गत दोन वर्षांपासून पश्‍चिम वर्‍हाडातील शेतकर्‍यांना खरीप हंगामात फटका बसत असून, पीक विम्याचा आधार मिळत आहे. त्यामुळे यावर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेकडे पश्‍चिम वर्‍हाडातील शेतकर्‍यांचा सर्वाधिक कल राहणार आहे. असा राहणार पीक विम्याचा लाभ!-पीक विमा योजनेत शेतकर्‍यांना भरावयाचा हप्ता खरीप ज्वारी जोखीम स्तर ७0 टक्के, विमा संरक्षित रक्कम २४ हजार रुपये, विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर २ टक्के व शेतकर्‍यांना पडणारा विमा हप्ता ४८0 रुपये आहे.-तूर पिकासाठी जोखीम स्तर ७0 टक्के, विमा संरक्षित रक्कम २८ हजार रुपये, विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर २ टक्के व शेतकर्‍यांना पडणारा विमा हप्ता ५६0 रुपये आहे.- सोयाबीन जोखीम स्तर ७0 टक्के, विमा संरक्षित रक्कम ३६ हजार रुपये, विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर २ टक्के व शेतकर्‍यांना पडणारा विमा हप्ता ७२0 रुपये आहे.- कापूस जोखीम स्तर ७0 टक्के, विमा संरक्षित रक्कम ३६ हजार रुपये, विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर ५ टक्के व शेतकर्‍यांना पडणारा विमा हप्ता १ हजार ८00 रुपये राहणार आहे.