शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
4
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
5
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
6
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
7
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
8
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
9
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
10
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
11
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
12
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
13
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
14
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
15
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
17
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
18
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
19
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
20
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू

Corona Cases : अकोल्यात आणखी एकाचा मृत्यू, २१० नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 12:46 IST

CoronaVirus in Akola : ३१ मार्च रोजी आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ४५२ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, बुधवार, ३१ मार्च रोजी आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ४५२ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ९१, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ११९ अशा एकूण २१० जणांचा अहवाल पाझिटिव्ह आल्याने आतापर्यंतच्या एकूण बाधितांचा आकडा २७,६५४ वर गेला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ६३८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९१जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५४७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मलकापूर येथील सात, जठारपेठ येथील पाच, मोठी उमरी व केशव नगर येथील प्रत्येकी चार, गोरक्षण रोड, रामदासपेठ व बाळापूर येथील प्रत्येकी तीन, उरळ, अकोट, देवरी, पारस, न्यु तापडीया नगर, लहान उमरी, निबंधे प्लॉट, जूने शहर, राऊतवाडी, जीएमसी, तोष्णीवाल लेआऊट, राम नगर व शिवणी येथील प्रत्येकी दोन, कृषी नगर, खंडाळा, एमआयडीसी, मिर्झापूर, भौरद, मनारखेड, शेळद, कादवी, देशमुख फैल, बिर्ला राम मंदिर, रामगाव, गजानन नगर, डाबकी रोड, सांगळूद, कोठारी वाटीका, बार्शीटाकळी, तुकाराम चौक, कौलखेड, टॉवर चौक, पारस, हिंगणा रोड, आदर्श कॉलनी, विजय नगर, शंकर नगर, पातूर, तारफैल, घुसर, अयोध्या नगर, आर्युवेदिक कॉलज, सिव्हील लाईन, निंभा ता.मुर्तिजापूर, शिवापूर, खडकी, बालाजी नगर, राधाकृष्ण टॉकीज व कुंभारी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

अकोट येथील महिलेचा मृत्यू

कोरोनावर उपचार सुरु असलेल्या बोलके प्लॉट, अकोट येथील ७० वर्षीय महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. त्यांना २२ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.

 

६,५२८ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २७,६५४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २०,६७४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४५२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,५२८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला