अकोला, दि. २३- अकोट फैलमधील भीमनगर येथे मुलीच्या विनयभंगाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. यावेळी दोन्ही गटातील युवकांनी दोन-तीन दुकानांची तोडफोड केल्याने या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र वेळीच पोलिसांचा ताफा पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.भीमनगर चौकातील चहाच्या दुकानांसह काही खाद्यपदार्थांच्या दुकानावरही परिसरातील काही युवकांनी लोखंडी पाइप व काठय़ांनी हल्ला चढवून दुकानातील साहित्यांची तोडफोड केली. या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये धावपळ झाली. हा वाद नेमका कशामुळे झाला, याबाबत पोलिसांकडे कुठलीच माहिती नव्हती; मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून हा वाद मुलीच्या छेडखानीवरून झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील आणि ठाणेदार अनिल ठाकरे यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीची पाहणी केली.
दोन गटात हाणामारी
By admin | Updated: January 24, 2017 02:28 IST