शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
5
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
6
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
7
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
8
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
9
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
10
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
11
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
12
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
13
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
14
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
15
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
16
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
17
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
18
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
19
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
20
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!

नाफेड केंद्रावर आतापर्यंंत १.१५ लाख क्विंटल तूर खरेदी!

By admin | Updated: March 11, 2017 02:03 IST

१५ एप्रिलपर्यंंत तूर खरेदी; आणखी ५0 हजार क्विंटल तूर येईल!

अकोला, दि. १0- कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नाफेडच्या शासकीय तूर खरेदी केंद्रावर जिल्हय़ातील शेकडो शेतकरी गर्दी करीत आहेत. नाफेडच्या केंद्रावर दररोज हजारो क्विंटल तूर विक्रीसाठी येत असल्याने शेतकर्‍यांना मापासाठी वाट पाहावी लागत आहे. आतापर्यंंत नाफेडच्या शासकीय तूर खरेदी केंद्रावर १ लाख १५ हजार क्विंटल तुरीचे खरेदी झाली असून, आणखी ५0 हजार क्विंटल तूर विक्रीसाठी येण्याचा अंदाज आहे. नाफेडच्या खरेदी केंद्रावर तुरीला ५0५0 रुपये दर मिळत असल्याने, शेतकर्‍यांचा कल शासकीय तूर खरेदी केंद्राकडे अधिक आहे. यावर्षी तुरीचे उत्पादन भरघोस झाल्यामुळे यंदा दर घसरले आहेत. अडत्यांकडून तुरीला ४000 ते ४२00 रुपये भाव मिळतो आहे. त्यामुळे ३0 ते १00 क्विंटल तुरीचे उत्पादन झालेला शेतकरी शासकीय तूर खरेदी केंद्रावर गर्दी करीत आहे; परंतु १0 ते १५ क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी अडत्यांकडे जाऊन तुरीची विक्री करीत आहेत. बाजारात तूर आणण्यासाठी द्यावे लागणारे वाहनाचे भाडे आणि मापासाठी सात ते आठ दिवस करावी लागत असलेली प्रतीक्षा लक्षात घेता, वाहनमालकाला भाडे देणे शक्य नसल्याने, किरकोळ शेतकरी अडत्याकडे जात आहेत; परंतु ज्या शेतकर्‍यांकडे ट्रॅक्टरसह इतर मालवाहू वाहने आहेत. तेच नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी आणत आहेत. अडत्याच्या तुलनेत नाफेडचा भाव अधिक असल्यामुळे शेतकरी आठ दिवस थांबून तुरीची विक्री करीत आहेत. गेल्या दिवसात नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनने ७५ हजार क्विंटल तर विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने ४0 हजार क्विंटलची तूर खरेदी केली आहे. सध्या नाफेडच्या केंद्रावर बारदाण्याचा साठाही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करण्यात आला. त्यामुळे आणखी दोन महिने बारादाणा पुरेल, अशी अपेक्षा नाफेडच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. तुरीची वाढलेली आवक पाहता, नाफेडकडून १५ एप्रिलपर्यंंत तूर खरेदी करण्याची शक्यता नाफेडच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली.