शहरं
Join us  
Trending Stories
1
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
2
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
3
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
4
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
5
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
6
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
7
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती
8
भोसले घराण्याची दौलत आहे ही ७० लाखांची तलवार
9
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
10
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
11
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
12
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
13
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
14
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
15
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
16
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
17
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
18
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
19
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
20
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी

पंधराशे कोटीच्या खर्चानंतर जिगाव प्रकल्प ‘अंधातरी’

By admin | Updated: November 14, 2015 02:14 IST

माती भिंत व सांडवा रखडलेला.

नांदुरा (जि. बुलडाणा): राज्यातील मोठे सिंचन प्रकल्प पुर्ण होण्यासाठी दशकांचा कालावधी लागला तोच प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील महत्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाबाबत घडत आहे. आतापर्यंंत पंधराशे कोटी रुपयांचा खर्च केल्यानंतरही प्रकल्प अंधांतरी असून मागीलवर्षी नगण्य काम झाल्यानंतर यावर्षी शेतकर्‍यांचा विरोध असल्याने माती भिंत व सांडव्याचे काम पुन्हा एकदा बंद पडले आहे. प्रकल्पाच्या माती भिंतीचे काम सुरु करण्यासाठी २00७ मध्ये शेतकर्‍यांनी सरळ खरेदीने शेतजमीनी दिल्या. त्यावेळी त्यांना सरासरी एकरी ९0 हजार एवढाच मोबदला मिळाला होता. मात्र आज रोजी धरणाच्या इतर कामांसाठी संपादीत केल्या जाणार्‍या शेतीला त्यांच्या सात ते आठ पट एवढा मोबदला मिळत असल्याने आधी शेजजमीनी देणार्‍या शेतकर्‍यांनी उपोषण व धरणाच्या कामाला विरोध करुन काम बंद पाडले आहे. प्रकल्प पुन्हा रेंगळणार असल्याचे चित्र दिसत आहे. जिगाव प्रकल्पाच्या कामाला सुरवातीला यंत्र सामुग्री जाळण्यापासून ते अधिकार्‍यांच्या कपडे फाडण्यापर्यंंतची व वेळोवेळी कामबंद पाडणारी आंदालने झाली आहेत. पुर्नवसनाच्या कामाला व मोबदला वितरीत करायला वेळ लागत असल्याने प्रकल्पाच्या कामाला खिळ बसली आहे. पंधराशे कोटी रुपयांच्या खर्चानंतरही प्रकल्प अंधातरीच राहणार काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. *२५ वर्षात ३0 टक्के काम जिगाव प्रकल्पाला १९९0 च्या फेब्रुवारी महिन्यात सुमारे चारशे कोटीची पहिली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. म्हणजेच २५ वर्षापूर्वी मान्यता मिळालेल्या या प्रकल्पाचे आजरोजी जेमतेम ३0 टक्के काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंंत पंधराशे कोटीचा खर्च झाला व एकाही गावाचे पुर्णता पुर्नवसन झालेले नाही.