अकोला : तोष्णीवाल लेआऊट हा भाग नागरी वस्तीऐवजी आता शिकवणी वर्गांंंंचा परिसर म्हणून जास्त ओळखला जातो. या परिसरात मोठय़ा प्रमाणात शिकवणी वर्ग असल्याने हजारोंच्या संख्येने विद्यार्थी ये-जा करतात. असहाय्य विद्यार्थ्यांंंंचा फायदा घेऊन त्यांना लुटणारी गुंडांची एक टोळीच या भागात सक्रिय झाली आहे. विद्यार्थ्यांंंंना मारहाण करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे, मोबाईल, पैसे हिसकण्याचे प्रकार या भागात सातत्याने घडताहेत; परंतु पोलिसांकडून हा प्रकार रोखण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने गुंडांचे मनोबल वाढले आहे. शहरातील तोष्णीवाल लेआऊट, दूध डेअरी रोड, सिव्हिल लाईन, राऊतवाडी आदी परिसरात मोठय़ा प्रमाणात शिकवणी वर्ग आहेत. या शिकवणी वर्गांंंंमध्ये दररोज हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. सोबतच अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ शहरांसह ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा शिक्षणासाठी मोठय़ा संख्येने अकोल्यात आले आहेत. शिकवणी वर्ग परिसरालगतच या विद्यार्थ्यांंंंनी भाड्याने खोली घेतल्या आहेत. खाणावळी लावल्या आहेत. आई-वडिलांपासून दूर राहून ही मुले शिक्षणासाठी येतात; परंतु या विद्यार्थी व त्यांच्या पालकांवर पश्चात्तापाला सामोरे जाण्याची वेळ आली. विद्यार्थ्यांंंंना गावगुंडांकडून त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांंंंच्या शिकवणी वर्ग, रूमवर जाऊन गुंडांकडून खंडणी वसूल केली जात असल्याचे प्रकार अलीकडे प्रचंड वाढले आहेत. खंडणी दिली नाहीतर विद्यार्थ्यांंंंना मारहाण करण्यात येते, जीवे मारण्याची धमकी देण्यात येते. यानंतरही विद्यार्थ्याने पैसे दिले नाही तर त्याच्यावर सशस्त्र हल्ला करण्यात येतो. गुंडांच्या टोळीने विद्यार्थीच नाहीतर प्राध्यापक वर्गही त्रस्त झाला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये अनेकदा तक्रारी करण्यात आल्या; परंतु पोलिसांनी विद्यार्थ्यांंंंच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप शिकवणी वर्ग संचालकांनी केला.
शिकवणी वर्ग परिसरात गुंडांची टोळी सक्रिय
By admin | Updated: July 8, 2014 00:23 IST