शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

पश्‍चिम विदर्भात ६६ कांदा चाळींची उभारणी

By admin | Updated: May 28, 2016 01:48 IST

कांदा चाळ शेतक-यांसाठी आधार : १ हजार ६५0 मेट्रिक टन कांद्याची साठवण.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (जि. बुलडाणा)राज्यात मागील वर्षी जवळपास सात लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन झाले होते. कांदा उत्पादनात सातत्याने वाढ होत असून, योग्य प्रकारे साठवण न केल्यास ५0 ते ६0 टक्क्यांपर्यंत कांद्याचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी आणि कांदा जास्त काळ टिकवण्यासाठी कांदा चाळ योजना राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षभरामध्ये पश्‍चिम विदर्भात ६६ कांदा चाळींची उभारणी करण्यात आली असून, यामध्ये १ हजार ६५0 मेट्रिक टन कांद्याची साठवणूक झाली आहे. आधीच निसर्गाची अवकृपा आहे. त्यात कसाबसा जगवलेला कांदा दुष्काळात आधार देईल, अशी भावना मनात असताना कांद्याच्या कोसळलेल्या दराने शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे. एकेकाळी कांद्याच्या गगनाला भिडणार्‍या किमतीमुळे नागरिकांवर रडण्याची वेळ आली होती; मात्र आता कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. ठोक बाजारात कांद्याची किंमत जवळपास ५00 रुपये क्विंटलवर येऊन पोहोचली आहे. सध्या व्यापार्‍यांकडून केवळ चार ते पाच रुपये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे. त्यामध्ये कांदा उत्पादनासाठी शेतकर्‍यांना लागलेला खर्चही भरून निघणार नाही. कांदा हे नाशवंत पीक आहे. त्याला शास्त्रोक्त पद्धतीने साठवले नाही, तर त्याची नासाडी होते. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात कांदा विक्री करतात; परंतु कांद्याचे नुकसान टाळण्यासाठी आणि तो जास्त काळ टिकवण्यासाठी कांदा चाळीचा योग्य पर्याय शेतकर्‍यांपुढे आहे. कांदा चाळ उभारण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. कांद्याचे दर वाढणे किंवा अचानक कमी होणे याचे एक कारण कांद्याच्या साठवणक्षमतेत आहे. आजही बहुतांश शेतकरी कांदा चाळ योजनेचा लाभ घेताना दिसत नाहीत. त्याचा फटका बाजारभावातील चढ-उतारात सगळ्यांनाच बसतो. कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी ६0 टक्के कांदा हा रब्बी हंगामात म्हणजेच एप्रिल ते मेमध्ये तयार होत असून, सध्या बाजारात नवीन कांदा आलेला आहे. एकाच वेळी हा कांदा बाजारात आला की, भाव पडतात; पण तो दोन-तीन महिने कांदा चाळीत साठवला, तर जून ते ऑक्टोबरपर्यंत टिकतो. या काळात कांद्याला चांगला दर मिळतो.