शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

५0 हजारात विजयाचा धनी!

By admin | Updated: October 8, 2014 01:09 IST

पंचरंगी लढतीमुळे पुन्हा १९९९ च्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याचा कयास.

अकोला- राज्यात १९९९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढविली होती. त्यावेळी विजयी उमेदवारांना मिळालेली मतं ३५ ते ५0 हजारांच्या घरात होती. आता १५ वर्षांंनंतर पुन्हा एकदा या दोन पक्षांसोबतच शिवसेना आणि भाजप हे युतीतील दोन पक्षही स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच जिल्ह्यात भारिप-बमसं या पक्षाचे उमेदवारही निवडणूक लढवित असल्याने जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात पंचरंगी लढतीचे तर काही मतदारसंघात तुल्यबळ अपक्षांमुळे बहुरंगी लढतीची शक्यता आहे. मतदारांच्या संख्येसोबतच उमेदवारांची संख्याही वाढली असल्याने १५ वर्षांपूर्वीचाच आकड्यांचा खेळ यावेळीही बघावयास मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून १९९९ मध्ये स्व तंत्र निवडणूक लढविली होती. त्यानंतरच्या निवडणुका या दोन पक्षांनी आघाडी करून लढल्यात. आता १५ वर्षांंची आघाडी फुटली. त्यामुळे स्वतंत्र लढत असलेल्या या दोन पक्षांसोबतच युतीतही फूट पडल्याने प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची संख्या यावेळी वाढली आहे. त्यासोबतच आकोट, बाळा पूर आणि मूर्तिजापूर या तीन मतदारसंघात लाखाच्यावर नवीन मतदारांची भर पडली असून, अकोला पश्‍चिम आणि अकोला पूर्व या दोन मतदारसंघातील सरासरी ६५ हजारांपेक्षा अधिक नावं मतदारांची नावे यादीत समाविष्ट झाली आहेत. मतदारांची संख्या वाढली असली तरी या मतांचे दावेदारही यावेळी वाढले आहेत. उमेदवारांची संख्या वाढल्याने विजय मिळविण्यासाठी आवश्यक मतांची सं ख्याही घटणार आहे. १९९९ मध्ये बोरगाव मंजू आणि अकोला वगळता इतर मतदारसंघात विजय मिळविणार्‍या उमेदवारांना ३५ ते ४0 हजारांच्या घरात मतं मिळाली होती. बोरगाव मंजूमध्ये भारिप- बमसंच्या तिकिटावर लढणारे डॉ. दशरथ भांडे यांनी ५१३२९ मतं मिळवून शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार विजय मालोकार यांच्याविरुद्ध १0 हजारांपेक्षा अधिक मताधिक्यांनी विजय मिळविला होता. तत्कालीन अकोला आणि आताच्या अकोला पूर्व मतदारसंघात १९९९ च्या निवडणुकीत गोवर्धन शर्मा यांनी ५१६४६ मतं मिळविली होती. यावेळी या पाचही मतदारसंघातील तुल्यबळ लढती बघता १९९९ च्या मतांचेच गणित पुन्हा दिसण्याची शक्यता आहे. १९९९ मध्ये एकत्र लढणारे शिवसेना व भाजपही यावेळी स्वतंत्र लढत आहेत. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बसपा, एमडीपी, सपा, रि पाइं आणि काही मतदारसंघात प्रबळ अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. त्यामुळे यावेळी विजयी उमेदवारांचे गणितं ४५ ते ५0 हजारांच्या घरातच राहण्याची दाट शक्यता आहे. मताधिक्याचा विचार केला तर अकोला आणि मूर्तिजापूर हे दोन मतदारसंघ वगळता इतर मतदारसंघा त विजयी उमेदवाराचे मताधिक्य सरासरी १0 हजारांच्या घरात होते. अकोला मतदारसंघातून गोवर्धन शर्मा यांना २५१५ तर मूर्तिजापूरमध्ये संजय धोत्रे यांना ४७00 मतांनी विजय मिळाला होता. आता २0१४ च्या निवडणुकीत सर्वच मतदारसंघात पंचरंगी लढती होणार आहेत. काही ठिकाणी बहुरंगी लढती होण्याची शक्यता आहे. १९९९ मध्ये काही मतदारसंघात दिग्गजांना निसटता विजय मिळाला होता. काही मतदारसंघात आताची परिस्थितीसुद्धा तशीच आहे.