अहमदनगर : जयहिंद युवा मंच व एनएसयुआयच्या वतीने सुरू असलेल्या युवक महोत्सवाचा रविवारी सायंकाळी समारोप झाला़. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले़ गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या युवक महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ जलतरण स्पर्धा, बुध्दिबळ,नृत्य स्पर्धा आणि नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले़ नोकरी मेळाव्यास शहरसह जिल्हाभरातून युवकांनी हजेरी लावली़ या मेळाव्यात पाच हजार युवक-युवतींनी सहभाग घेतला़नोकरी मेळाव्यात युवकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली़या मेळाव्यात ३२ कंपन्यांनी सहभाग घेतला़ प्रथमच एवढ्या कंपन्यांनी मेळाव्यात हजेरी लावली़मेळाव्याच्या समारोप प्रसंगी नोकरीसाठी निवड झालेल्या युवकांना नियुक्ती पत्राचेही वाटप करण्यात आले़ मेळाव्यात विविध महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली़ स्पर्धा परीक्षा केंद्राबाबतची यावेळी माहिती देण्यात आली़ अभियांत्रिकी,मेडिकल आणि स्पर्धा परीक्षाबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले़ याशिवाय छत्रपती शिवाजीमहारांच्या स्वप्नातील युवक,याविषयी प्रा़ नितीन बानगुडे पाटील यांनी मार्गदर्शन केले़प्रसिध्द करिअर व्याख्याता समृध्दी जाधव यांनी समारोप प्रसंगी युवकांना मार्गदर्शन केले़यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे,माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी नगरसेवक धनंजय जाधव उपस्थित होते़ महोत्सवात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिक वितरण करण्यात आले़ कार्यक्रमाचे सूत्र संचालन अमोल बागुल यांनी केले़ (प्रतिनिधी)नृत्य स्पर्धा : वैयक्तिक- विभागून प्रथम -ऐश्वर्या सांगळे, तृप्ती बेल्हेकर दुसरा विभागून- स्वप्नील चव्हाण, अमोदी सानप तिसरा विभागून- निखिल घोडके,पवन साळवे डॉन्स आॅफ द डे चषक- राजेश व्यवहारे सामूहिक नृत्य स्पर्धा- प्रथम विभागून- वम्पायर ग्रुप, मास्टर गु्रप दुसरा- अंजली नृत्यालय,लॉकर गु्रप तिसरा-सही ग्रुप, भाग्यश्री ग्रुप उत्तेजनार्थ- आकांक्षा ग्रुप,डान्स युनिवर्सल नगरबॉक्सिंग स्पर्धेत १८ वर्षे वयोगटात उस्मान शेख यांनी ४८ किलो वजनगटात प्रथम क्रमांक पटकावला़ तर योगेश मांढरे यांने द्वितीय क्रमांक पटकावला़ ५२ किलो- प्रथम- फारुक पठाण, व्दितीय- स्वप्नील चोरडिया ५६ किलो- प्रथम- समीर सय्यद,व्दितीय- अक्षय गवोर ६० किलो- प्रथम सुरज भोसले,व्दितीय- पोपट रोकडे
युवक महोत्सवाचा समारोप
By admin | Updated: May 26, 2014 00:25 IST