जामखेड : तालुक्यातील आपटी येथील नरसिंग विठोबा मत्रे (वय १०२) यांचे ५ जुलै रोजी नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ही बातमी त्यांची पत्नी कोंताबाई (वय ९०) यांना समजताच अवघ्या काही तासात त्यांनीही प्राण सोडला.
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व आपटीचे माजी सरपंच युवराज मत्रे व श्री साकेश्वर विद्यालयातील सहशिक्षक महादेव मत्रे यांचे ते आई - वडील होत. नरसिंग मत्रे यांच्यावर नगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागोमाग काही तासातच त्यांच्या पत्नी कोंताबाई यांनीही प्राण सोडला. त्यांचे राहत्या घरीच निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. महिला कुस्ती मल्लविद्द्या संघटनेच्या जिल्हाध्यक्षा शिल्पा मत्रे यांचे ते आजी, आजोबा होत.