शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

सुनियोजित शिर्डी वसवावी

By admin | Updated: June 16, 2014 00:08 IST

शिर्डी : मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार देशात नवीन शंभर शहरे वसवणार आहे़ त्याच धर्तीवर नवीन व सुनियोजित नवीन शिर्डी वसवण्याची संकल्पना शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे

शिर्डी : मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार देशात नवीन शंभर शहरे वसवणार आहे़ त्याच धर्तीवर नवीन व सुनियोजित नवीन शिर्डी वसवण्याची संकल्पना शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मांडली़ सभामंडपाऐवजी पाणी अडवा व पाणी जिरवा यासाठी आपण केंद्राकडून निधी मिळवून देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली़रविवारी (दि़ १५) साईनगरीतून लोखंडे यांनी कामकाजाचा श्रीगणेशा केला आहे़ साईसंस्थानच्या सभागृहात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांनी येथील समस्या जाणून घेतल्या़ यावेळी कार्यकारी अधिकारी कुंदन सोनवणे, उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार सुभाष दळवी, मुख्याधिकारी धैर्यशील जाधव, भाजपाचे शहराध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शिवसेना तालुका प्रमुख कमलाकर कोते, नितीन कापसे, संजय शिंदे, सचिन कोते, विनोद संकलेचा, सचिन शिंदे, सुरेश आरणे, मच्छिंद्र गायके आदींची उपस्थिती होती़संस्थानने २००५ पर्यंतच्या कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे़ त्याऐवजी रेल्वे प्रकल्पग्रस्तांसह २००७ पर्यंतच्या २३०० कामगारांचा प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना लोखंडे यांनी केली़ ३७६ घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संस्थानची जागा नगरपंचायतकडे हस्तांतरित करणे, समाधी शताब्दीच्या कामांना गती येण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीसाठी तसेच थेट धरणातून पाईपने पाणी आणण्याच्या प्रस्तावाचा आपण पाठपुरावा करु, अशी ग्वाही देतानाच लोखंडे यांनी पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल यांच्याशी या प्रकल्पाबाबत चर्चाही केली़ शहरात सिमेंटऐवजी पेवरब्लॉकचे रस्ते करावेत, प्रलंबित असलेल्या व गुन्हेगारांचा अड्डा बनलेल्या तलाठी कार्यालयाचे काम त्वरित सुरु करावे, शहरातील सबस्टेशनची क्षमता वाढवण्याचा प्रस्ताव पाठवावा, शहरात केबलसाठी खोदलेले रस्ते तीन दिवसात दुरुस्त न झाल्यास नगरपंचायतने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या़साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापन समितीत तसेच साईसमाधी शताब्दीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बनवण्यात आलेल्या समितीत केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी खासदार लोखंडे यांचा समावेश करावा यासाठी सेना-भाजपाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे कमलाकर कोते व राजेंद्र गोंदकर यांनी सांगितले़(वार्ताहर)