शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

साई मंदिर परिसरात पाण्याच्या बाटल्यांनाही बंदी

By admin | Updated: June 20, 2014 00:37 IST

शिर्डी : जगाला मानवतेचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात आता मोबाईल नेणे सोपे आहे, मात्र पिण्याच्या पाण्याची बाटली नेणे संवेदनशील ठरत आहे़

शिर्डी : जगाला मानवतेचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात आता मोबाईल नेणे सोपे आहे, मात्र पिण्याच्या पाण्याची बाटली नेणे संवेदनशील ठरत आहे़ मंदिरातील दर्शन रांगेत पाण्याच्या बाटल्या आढळल्यामुळे जवळपास तेरा कंत्राटी सुरक्षा कर्मचाऱ्यांना आठ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे़गेल्या ९ जून रोजी प्रभारी कार्यकारी अधिकारी म्हणून शिर्डीचे प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांनी पदभार स्वीकारला़ पहिल्याच दिवशी मंदिरात गेल्यानंतर त्यांना दर्शन रांगेत पाण्याच्या बाटल्या आढळून आल्या़ याची गंभीर दखल घेत त्यांनी दर्शनबारीतील पाच व मंदिरातील आठ महिला रक्षकांवर कारवाईचे आदेश दिले़ आदेशाची तब्बल नऊ दिवसांनी अंमलबजावणी करत कामगार विभागाच्या सूचनेवरुन ठेकेदाराने संबंधित कर्मचाऱ्यांना तोंडी आदेशाने गुरूवारी आठ दिवसांसाठी घरचा रस्ता दाखवला़ तर सहा कायम कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या़ वास्तविक दर्शनबारीत संस्थान पाण्याच्या बाटल्यांची विक्री करते़ त्यानंतर शंभर पावलावर सुरक्षा रक्षक या बाटल्या पुन्हा जमा करून घेतात़ एकीकडे दर्शनबारीत बाटल्यांची विक्री करायची व भाविक त्या बाटल्या घेऊन मंदिरात आले तर सुरक्षा रक्षकांवर कारवाई करायची, संस्थानचा हा दुटप्पीपणा असल्याचे मत शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी व्यक्त केले आहे़एकीकडे आयबीसारख्या सुरक्षा यंत्रणांनी मंदिरात मोबाईल आणण्यावर प्रतिबंध घातलेला असताना मंदिर परिसरात सर्रास मोबाईल आणले जातात़ मात्र पाण्यासारख्या जीवनावश्यक वस्तूवर प्रतिबंध घातले जातात़दर्शनबारीत लहान मुले, वृद्धांना पाण्याची गरज असते़ अनेक भाविक पाण्याअभावी कासावीस होतात, भोवळ येऊन पडतात़ गर्दीत जेव्हा दर्शन रांगा शहरात लांबवर जातात तेव्हा उन्हातान्हात भाविकांना अव्वाच्या सव्वा दराने पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागतात़ तेव्हा संस्थानची यंत्रणा सावली तर दूर पाण्याचीही सोय करत नाही़ याबाबींकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता कोते यांनी व्यक्त केली आहे़ (वार्ताहर)