शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
3
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
4
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
5
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
6
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
7
२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण
8
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
9
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
10
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!
11
'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया
12
फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा
13
चीननं केला विश्वासघात, भारताला दिली 'या' देशाने साथ; ५ वर्षाचं टेन्शन मिटलं, शेतकऱ्यांना मोठा फायदा
14
Sneha Debnath : ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
15
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
16
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
17
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
18
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
19
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
20
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली

‘भोसे’ तून ‘सीना’त पाणी

By admin | Updated: August 10, 2016 00:24 IST

मिरजगाव : कुकडी प्रकल्पाच्या ओव्हरफ्लोचे पाणी भोसे खिंडीतून सीना धरणात सोडण्याचे आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधीकरणाने दिले आहेत.

यामुळे याबाबतच्या न्यायालयीन लढाईला मोठे यश आले आहे. या आदेशामुळे दरवर्षी हक्काचे ओव्हरफ्लोचे पाणी सीना धरणात येणार आहे. भोसेखिंड बहुचर्चित प्रकल्प मंजूर झाल्यानंतर कुकडीचे १.२ अश्व घनफूट पाणी सीना धरणात सोडण्याचा निर्णय महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने घेऊन २० नोव्हेंबर २००० मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. पण त्यानंतरही हे हक्काचे पाणी मिळत नसल्याने अ‍ॅड. शिवाजी अनभुले यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यात अ‍ॅड. कैलास शेवाळे, जलतज्ज्ञ मिलिंद बागल सहयाचिकाकर्ते म्हणून नंतर सहभागी झाले. सोमवारी सुनावणी होऊन ४०० क्युसेकने सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार आजपासून भोसे खिंडीत पाणी सोडण्याचे आदेश प्राधीकरणाचे प्राथमिक विवाद निवारण अधिकारी खलील अन्सारी यांनी दिले. त्यानुसार मंगळवारी सकाळी ७ वाजता भोसे खिंड बोगद्यातून ओव्हरफ्लोचे पाणी सोडले. या निर्णयाने १६ वर्षांनी या भागातील लोकांना हक्काचे १.२ अ. घ. फू. ओव्हरफ्लोचे हक्काचे मिळाले. आता दरवर्षी हे पाणी मिळणार आहे. या याचिकेच्या माध्यमातून अ‍ॅड. अनभुले यांनी या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. ओव्हरफ्लोचे पाणी १५ दिवस सोडण्याचे आदेश असल्याने धरणात १४०० दशलक्ष घनफूट पाणी येणे अपेक्षित आहे. यामुळे या भागातील खरीप पिकांना एक आवर्तन मिळू शकेल. सीना धरणात भोसे खिंडीतून कुकडीचे नियमित आवर्तन मिळण्यासाठी १० नोव्हेंबर २०१५ ला दाखल याचिकेची सुनावणी होणे बाकी आहे. (वार्ताहर)