शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

प्रतीक्षा ‘प्रसन्ना’च्या प्रतिसादाची!

By admin | Updated: June 23, 2014 00:08 IST

शहर बस सेवेचा तिढा : आधी चर्चा, नंतरच महासभेत विषय

अहमदनगर : आर्थिक नुकसान होत असल्याच्या कारणावरून बंद असलेली शहर बस सेवा सुरू करण्याबाबत महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी यांना आता प्रसन्नाच्या प्रतिसादाची प्रतीक्षा लागली आहे. प्रसन्नाच्या व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा झाली तरच करारामधील अटी शिथिल करून त्यांना नुकसान भरपाईबाबत विचार करण्याचा पवित्रा पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. बस सेवा सुरू होण्याबाबत दोन्ही बाजुंनी कोणतीही हालचाल झाली नसल्याने बस सेवेचा तिढा सुटण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत.प्रसन्ना पर्पल यांनी स्थायी समितीला दिलेला दरवाढीचा प्रस्ताव फेटाळल्याने शहर बस सेवा बंद करण्याचा निर्णय प्रसन्नाच्या व्यवस्थापनाने घेतला होता. त्यानंतर शहरामधील बस सेवा बंद झाली आहे. अचानकपणे बस सेवा बंद केल्याने महापालिकेने प्रसन्नाला नोटीस बजावली होती. प्रसन्नाच्या कार्यालयाला शनिवारी दुपारनंतर तसेच रविवारी सुटी असल्याने त्यांना नोटीस मिळाली नव्हती. सोमवारी कार्यालय उघडल्यानंतर नोटीस प्राप्त झाली तरच त्यामध्ये नेमके काय आहे, हे पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, असे प्रसन्नाच्या व्यवस्थापनाने सांगितले. दुसरीकडे प्रशासन आणि पदाधिकारी पातळीवरही कोणतीही चर्चा झाली नसल्याने शहर बस सेवेचा तिढा आणखीनच गुंतागुंतीचा झाला आहे. (प्रतिनिधी)प्रसन्नाच्या व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा होणे आवश्यक आहे. ते सेवा चालवायला तयार असतील तरच त्यांच्या दरवाढीचा विषय महासभेत घेता येऊ शकेल. महासभा होणारच आहे. मात्र त्यांचा विषय महासभेत घ्यायचा की नाही, हे प्रसन्नाच्या सकारात्मक चर्चेवर अवलंबून आहे. मात्र शहर बस सेवा सुरू करण्याबाबत निश्चित मार्ग काढण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.-संग्राम जगताप, महापौरप्रसन्ना आणि महापालिका यांच्यात झालेल्या कराराचा भंग करून वाढीव पैसे देणे शक्य नव्हते. म्हणून त्यांची मागणी फेटाळली. त्यांच्या मागणीप्रमाणे निर्णय घ्यायचे असतील तर करारात बदल करावा लागेल. त्यासाठी महासभेत निर्णय होणे आवश्यक आहे. महासभेत निर्णय झाला तरच तिढा सुटेल. -किशोर डागवाले, सभापतीमहापालिकेने पाठविलेली नोटीस अद्याप मिळालेली नाही. शनिवारी, रविवारी कार्यालयाला सुटी होती. सोमवारी नोटीस मिळाल्यास ती पाहूनच पुढील पाऊल टाकता येईल. आताच काही सांगता येणार नाही.-दीपक मगर, व्यवस्थापक, प्रसन्ना