शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
4
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
5
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
6
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
7
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
8
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
9
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
10
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
11
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
13
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
14
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
15
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
16
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
17
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
18
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
19
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
20
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड

तिघे दरोडेखोर गजाआड

By admin | Updated: September 3, 2014 23:58 IST

अहमदनगर : सारोळा कासार ते बाबुर्डी बेंद शिवारातील डोंगराच्या पायथ्याला आडोशा घेऊन बसलेली तीन जणांची टोळी नगर तालुका पोलिसांनी गजाआड केली आहे.

अहमदनगर : सारोळा कासार ते बाबुर्डी बेंद शिवारातील डोंगराच्या पायथ्याला आडोशा घेऊन बसलेली तीन जणांची टोळी नगर तालुका पोलिसांनी गजाआड केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.एस. तोडकर यांनी दिले आहेत.मंगळवारी (दि.३) पहाटेच्या सुमारास पोलिसांची गस्त सुरू असताना त्यांना डोंगराच्या पायथ्याशी काही इसम बसलेले दिसले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे तलवार, चाकू, कुऱ्हाड,सत्तुर, लाकडी दांडके असे साहित्य मिळाले. ते दरोड्याच्या तयारीत असल्याची कबुलीही चोरट्यांनी दिली. पाच जणांच्या या टोळीतील तिघांना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले. राहुल नेवाश्या भोसले (वय २१), गोरख चलाश्या भोसले (वय २१, दोघे रा. सारोळा कासार, ता.नगर), अवटर याकूब चव्हाण (रा. अनकुटे, ता. येवला) या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांना ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.यातील खलनायक उर्फ खल्या करामत काळे (रा. राजुरा, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) आणि राहुल्या चलाश्या भोसले (रा. सारोळा कासार) हे तिघे फरार आहेत. नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शंकर नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल आनंद सत्रे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस यांच्या पथकाने ही कारवाई केली. आनंद सत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)