श्रीगोंदा/ढवळगाव : देवदैठण (ता.श्रीगोंदा) येथील साजन शुगर गाळप हंगामाची सांगता आमदार बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत करण्यात आली. कारखान्याने कमी दिवसांत तीन लाख दहा हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले, तसेच १६ लाख युनिट वीज निर्माण केली.
हंगाम यशस्वी करण्यात मोलाची कामगिरी करणारे ऊस तोडणी मजूर, ऊस वाहतूकदार यांचा सन्मान करण्यात आला.
लालासाहेब पानसरे, रामचंद्र रायकर, सुदाम पवार (ऊस उत्पादक शेतकरी), भाऊ पिसे, नामदेव राठोड, बापू इथापे, हनुमंत मगर (ऊस वाहतूकदार), अरुण राठोड, गणेश सैदाणे, सुलतान पवार, साईदास राठोड, सोना पंडित, बाळू सोनवणे (ऊस तोडणी मजूर)
यांचा आमदार पाचपुते, साजन शुगरचे अध्यक्ष साजन पाचपुते, वृद्धेश्वर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव वाडगे, उद्योजक प्रदीप मगर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
बबनराव पाचपुते म्हणाले, साजन शुगरचे टीमवर्क चांगले झाले. त्यामुळे तीन लाख मे.टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला. यापुढेही मी कारखान्याच्या मागे खंबीरपणे उभा राहणार आहे.
साजन पाचपुते म्हणाले, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी मजूर, वाहतूक करणारे, अधिकारी, कामगार यांचे हे यश आहे. अधिकारी, कामगार यांना लवकरच बालाजी देवदर्शन ट्रीपचे आयोजन करणार आहे.
कार्यकारी संचालक रोहिदास यादव यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संतोष गुंड यांनी केले. नवनाथ देवकर यांनी आभार मानले.
--
१६ साजन शुगर
देवदैठण येथील साजन शुगरच्या वतीने ऊस उत्पादक, वाहतूकदार, मजूर यांचा सन्मान करताना, आमदार बबनराव पाचपुते, अध्यक्ष साजन पाचपुते व इतर.