विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील खरातवाडी येथे शनिवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्री तीन दोन ठिकाणी सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबविली. दत्तात्रय बबन नलगे यांचे कुटुंबिय घराबाहेर पटांगणात झोपलेले असताना चोरट्यांनी घराचा दरवाजा अलगद काढून घरात प्रवेश केला. व घरात ठेवलेले व महिलांच्या गळ्यातील असे पाच तोळ्यांचे दागिने व रोख पंधरा हजार असा सुमारे दीड ते दोन लाखांचा ऐवज लांबविला. चोरट्यांनी नंतर नाना महाराज भापकर यांच्या घराच्या मागील बाजुचा दरवाजा काढून सोन्याचे दागिने व पाच हजारांची रोकड लांबविली. चोरट्यांनी नंतर फराटे वस्तीकडे मोर्चा वळविला. परंतु येथील नागरिक जागे झाल्याने येथे त्यांच्या हाती काहीही लागले नाही. बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक वाखारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. (वार्ताहर)
चोरट्यांचा धुमाकूळ ; दागिने, रोकड लांबविली
By admin | Updated: May 26, 2014 00:25 IST