शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

‘मुळा’त पाणी आलेच नाही

By admin | Updated: June 30, 2014 00:34 IST

राहुरी : मुळा धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच जून महिना दुर्दैवी ठरला आहे़ १९७० पासून धरणात पहिल्यांदाच पाण्याची आवक शून्य अर्थात भोपळा ठरली आहे़

राहुरी : मुळा धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच जून महिना दुर्दैवी ठरला आहे़ १९७० पासून धरणात पहिल्यांदाच पाण्याची आवक शून्य अर्थात भोपळा ठरली आहे़ पाणलोट क्षेत्रात पावसाने अंगठा दाखविल्याने पाण्याची पातळी चिंताजनक बनली आहे़पाणलोट क्षेत्रावर असलेल्या क ोतूळ येथे पावसाळ्यात ९५० ते ११०० मिलीमिटर पाऊस पडतो़ येथील पावसावरच धरणाचे भवितव्य अवलंबून असते़ मागील वर्षीही क ोतूळ येथे १०५७ मिलीमिटर पावसाची नोंद झाली होती़ मे २०१४ मध्ये कोतूळ येथे ४० मिलीमिटर पावसाची नोंद झाली़ मात्र पाणी जमिनीत मुरल्याने धरणापर्यंत थेंबही येऊ शकलेला नाही़मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर कमी पाऊस झाला तर धरणाकडे पाणी येत नाही़ त्यासाठी किमान ११० मिलीमिटर पावसाची गरज असते़ तेवढा पाऊस जून महिन्यात अद्याप पडलेला नाही़ पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़ यंदा जून महिन्यात २०० मिलीमिटर पेक्षा जास्त पाऊस पाणलोट क्षेत्रावर पडेल व पाण्याची आवक सुरू होईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता़ मात्र अंदाजावर पाणी फिरल्याने शेतकऱ्यांचे नियोजन फिस्कटले आहे़२६००० दश्लक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या ५०९३ दश्लक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे़ २० टक्के पाणी शिल्लक दिसत असले तरी त्यापैकी ४५०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा मृत आहे़ केवळ ५९३ दश्लक्ष घनफूट पाणी उपयुक्त आहे़ पाण्याची पातळी खाली जात असल्याने मुळा धरणावर शेतकऱ्यांनी टाकलेल्या वीज पंपांचे जोड तोडण्याची मोहीम पाटबंधारे खात्याने हाती घेतली आहे़ (तालुका प्रतिनिधी)मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर जून महिन्यात २०० मिलीमिटर पाऊस अपेक्षित होता़ प्रत्यक्षात पावसाने हजेरी न लावल्याने यंदा जूनमध्ये पाण्याची आवक शून्य आहे़ धरणात पाणी साठवण्यास सुरूवात झाल्यापासून या महिन्यात पहिल्यांदाच पाणी येऊ शकलेले नाही़ येत्या तीन महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर धरणाच्या पाण्याची पातळी अवलंबून आहे़-आऱ एम़ कांबळे, मुळा धरण, शाखा अभियंतामुळा परिसरात हाय अ‍ॅलर्टपाटबंधारे खात्याने जलाशयातील शेतीसाठी मोटारीव्दारे होणारा पाणीपुरवठा बंद करण्याची मोहीम हाती घेतली असून, धरण परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्याचा सपाटा चालविला आहे़ आत्तापर्यंत ८६ मोटारींचा उपसा बंद करण्यात आला असून, उर्वरित ८० विद्युत मोटारींचा विद्युत पुरवठा खंडीत केला जाणार असल्याचे शाखा अभियंता आऱ एम़ कांबळे यांनी सांगितले़नियम काय सांगतोकोणत्याही जलाशयातून केवळ रब्बीसाठीच थेट धरणातून मोटारीव्दारे पाणी घेण्यास परवानगी आहे़ या काळात शेतकरी धरणात मोटारी टाकून पाणी उपसा करू शकतात़ परंतु उन्हाळ्यात असे पाणी घेण्यास बंदी आहे़ उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे, असा नियम आहे़ मात्र उन्हाळ्यात देखील मोठ्याप्रमाणात मोटारींव्दारे सर्रास पाणी उपसा केला जातो़या गावांना बसणार फटकाबारगाव, आंग्रेवाडी, पळशी, चास, वनकुटी, जांभळी, जांभूवन, वरवडी या गावांना फटका बसणार आहे़१६६ विद्युत मोटारींद्वारे पाणी उपसामुळा धरणात १६६ मोटारी बसविण्यात आल्या आहेत़ या मोटारींव्दारे पाणी उपसा सुरू आहे़ परंतु आता धरणातच पाणी न राहिल्याने मोटारी काढण्यात येत असून, काहींचा वीज पुरवठा खंडीत केला आहे़शेतकऱ्यांनी बसविलेल्या मोटारीच बंद करण्यात येत असल्याने पिकांसाठी शेतकऱ्यांना पाणी घेता येणार नाही़ त्यामुळे या शेतकऱ्यांना फटका बसेल़पाणी पातळी खालावलीजीवंत पाणीसाठा- ५९३ दलघफूमृतसाठा- ४५०० दलघफूदररोजचा उपसा- १२ दलघफू