अहमदनगर : भविष्य निर्वाह निधीची माहिती हवी असल्यास पूर्वी अर्ज भरून द्यावा लागत होता़ परंतु आता कार्यालय आॅनलाईन झाले असून, सर्व माहिती व्हॉट्सअॅपच्या ९४२३००८५९६ या क्रमांकावर देण्यात येत असल्याचे सहाय्यक आयुक्त हेमंत राऊत यांनी सांगितले़नाशिक येथील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आयुक्तालय व मराठा चेंबर आॅफ कॉमर्स अॅड इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने नागापूर औद्योगिक वसाहतीत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते़ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे जगदीश तांबे, क्रॉम्टनचे प्रदीप साळवे, बी़ आर साबळे, रावसाहेब सोर, ए़ ए़ शेख आदी उपस्थित होते़ उद्योजक व प्रतिनिधींना भविष्यनिर्वाह निधीबाबत आॅनलाईन काम करताना येणाऱ्या अडचणी व नवीन बदलाबाबत राऊत यांनी माहिती दिली़ ते म्हणाले, कर्मचारी भविष्य निधीचे काम आॅनलाईन करण्यात झाले आहे़ या प्रक्रियेत डीजीटल सही महत्वाची आहे़ डीजीटल सहीचा वापर आॅनलाईन ट्रॉन्सफरसाठी केला जातो़ त्यामुळे उद्योजकांनी लवकरात लवकर डीजीटल सही ईपीएफओ संकेतस्थळावर अपलोड करावी, असे आवाहन राऊत यांनी केले़ कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधीची माहिती घेण्यासाठी पीएफ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही़ ईपीएफओ पोर्टलवर सर्व माहिती उपलब्ध आहे़ भविष्य निर्वाह निधीचे क्षेत्रीय कार्यालय फेसबुकवर आहे़ याद्वारे माहिती मिळवावी, असे आवाहन राऊत यांनी केले़ (प्रतिनिधी)
‘व्हॉटस् अॅपवर पीएफ सुविधेचा लाभ घ्या’
By admin | Updated: June 20, 2014 00:37 IST