अहमदनगर : मार्च महिना सुरू झाला आहे. उन्हाचा चटका वाढला आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढलेली असतांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची वेळ बदलण्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. शाळेच्या वेळा बदलण्यापेक्षा शिक्षण विभागाचे पदाधिकारी, सदस्य आणि अधिकारी केरळ दौऱ्यात मस्त असल्याचे चित्र आहे. दरवर्षी १ मार्चला जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची वेळ बदलली जाते. ऊन आणि पिण्याच्या पाण्यासाठी शाळेची वेळ सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारापर्यंत होते. यंदा मात्र, ११ मार्चपर्यंत जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षण विभागाने शाळांच्या वेळा बदलण्याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. शाळेची वेळ न बदलण्याने विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचा फटका शाळेतील विद्यार्थ्यांना झळा बसतांना दिसत आहे. काही ठिकाणी विद्यार्थी घरून पाण्याच्या बाटल्या भरून आणत असून त्यांना दिवसभर गरम पाणी पिण्याची वेळ आली आहे. बैठकीकडे लक्षयेत्या १५ तारखेला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची मासिक बैठक होणार आहे. या बैठकीत शाळांच्या वेळा बदलण्याच्या विषयावर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीकडे जिल्ह्यातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष आहे.
उन्हाचा चटका; विद्यार्थ्यांना फटका
By admin | Updated: March 10, 2016 23:10 IST