बोटा : अकलापूर (ता़ संगमनेर) परिसरातील आभाळवाडी येथे एका तरुण शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही घटना गुरूवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली़ याप्रकरणी घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. नवनाथ दगडू आभाळे (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आभाळवाडी येथे गुरूवारी सकाळी शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या नवनाथ आभाळे यांनी शेतातील सुभाबळीला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून जीवनयात्रा संपवली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. शिवाजी बापू जाधव यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप निघोट करीत आहेत. (वार्ताहर)
तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2016 00:49 IST