शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
2
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
3
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
4
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
5
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
6
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
7
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
8
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
9
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
10
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
11
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
12
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
13
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
14
७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...”
15
"स्मिता तळवलकर नाराज झाल्या आणि मी...", 'लक्ष्मी निवास' फेम तुषार दळवींनी सांगितला 'तो' किस्सा
16
चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली; भारताने आधीच घेतला आक्षेप
17
Nashik: 'आई, तुला त्रास द्यायचा नाही, तू...'; पोलीस महिलेच्या लेकीने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये काय?
18
भज्जीनं मारलेली ती 'थप्पड' श्रीसंतच्या लेकीच्या मनाला लागलीये! फिरकीपटूनं शेअर केली त्यामागची स्टोरी
19
झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार
20
Tripti Sahu : "TV स्टार्स गोरं होण्यासाठी घेतात इंजेक्शन", पंचायत फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

राज्य नाट्य स्पर्धेचा बिगुल वाजला

By admin | Updated: November 3, 2016 01:01 IST

अहमदनगर : हौशी रंगकर्मींना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी राज्य नाट्य स्पर्धा ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे़ या स्पर्धेत नगर शहर व जिल्ह्यातील

अहमदनगर : हौशी रंगकर्मींना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी राज्य नाट्य स्पर्धा ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे़ या स्पर्धेत नगर शहर व जिल्ह्यातील १५ नाट्य संस्थांनी सहभाग घेतला आहे़ ही स्पर्धा म्हणजे नगरकरांसाठी मनोरंजनाची पर्वणीच ठरते़ राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी हौशी नाट्यकर्मींसाठी राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा घेतली जाते़ स्पर्धेचे हे ५६ वे वर्षे आहे़ राज्यातील विविध केंद्रांवर या स्पर्धेची प्राथमिक फेरी घेतली जाते़ नगर केंद्रावरील प्राथमिक फेरी ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे़ दररोज सायंकाळी ८ वाजता येथील माऊली संकुलातील सभागृहात या स्पर्धेतील विविध नाटके सादर केली जाणार आहेत़ यातून प्रथम क्रमांकाच्या नाटकाची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात येणार आहे़ २२ नोव्हेंबरला स्पर्धेचा समारोप होणार आहे़८ नोव्हेंबरला जिल्हा हौशी नाट्य संघ, नगर (दिग्दर्शक -अमोल साळवे), ९ नोव्हेंबरला एकात्मता युवक मंच (दिग्दर्शक नाना मोरे), १० नोव्हेंबरला जिप्सी प्रतिष्ठान (दिग्दर्शक-शशिकांत नजान), ११ नोव्हेंबरला कार्ने अकादमी, श्रीरामपूर( दिग्दर्शक अजय घोगरे), १२ नोव्हेंबरला नगर तालुका कला क्रीडा अकादमी (दिग्दर्शक- काशिनाथ सुलाखे), १३ नोव्हेंबरला नवरंग नाट्य प्रतिष्ठान (दिग्दर्शक - गोकुळ क्षीरसागर), १४ नोव्हेंबरला ओम गुरुदेव माध्यमिक विद्यालय (कोपरगाव), १५ नोव्हेंबरला रंगकर्मी प्रतिष्ठान (दिग्दर्शक- सतीश लोटके), १६ नोव्हेंबरला रंगोदय प्रतिष्ठान (दिग्दर्शक - सागर खिस्ती), १७ नोव्हेंबरला साईप्रीत प्रतिष्ठान (संजय लोळगे), १८ नोव्हेंबरला सप्तरंग थिएटर्स (दिग्दर्शक -श्याम शिंदे), १९ नोव्हेंबरला सार्थक बहुउद्देशीय संस्था (दिग्दर्शक - संदीप कदम), २० नोव्हेंबरला सद्गुरू बहुउद्देशीय संस्था (दिग्दर्शक - रवींद्र वाणी), २१ नोव्हेंबरला सूर्यतेज संस्था, कोपरगाव (डॉ़ मयूर तिरमुखे), २२ नोव्हेंबरला यद्न्यवल्क्य नागरी पतसंस्था (दिग्दर्शक - अमित खताळ) या संस्थांची नाटके होणार आहेत़ (प्रतिनिधी)सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी ही स्पर्धा पार पाडण्यासाठी केंद्र स्तरावर समन्वयकाची नियुक्ती करण्यात येते़ या वर्षी स्पर्धेचे समन्वयक म्हणून नगरमधील नाट्यकर्मी सागर मेहेत्रे यांची निवड करण्यात आली़ निवडीनंतर मेहेत्रे यांनी स्पर्धक संघांची बैठक माऊली संकुलाच्या सभागृहात घेऊन नाटक सादरीकरणाची वेळ रात्री ८ वाजताची ठरविली़ यावेळी सतीश लोटके, श्याम शिंदे, शशिकांत नजान, रितेश साळुंके, संजय लोळगे, सागर खिस्ती, अमित खताळ, अमोल साळवे उपस्थित होते़