या संदर्भात शनिवारी कारखान्याचे कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांना एक निवेदन देण्यात आले. या निवेदनावर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर, दीपक भोसले, ॲड. बाळासाहेब काकडे, वैभव पाचपुते, जिजाबापू शिंदे, अजित जामदार, बापू भोस, बाळाप्पा पाचपुते यांच्या सह्या आहेत.
कारखाना संचालक मंडळाने साखरेचे वाढते भाव विचारात न घेता दोन लाख साखर पोती शिवम एंटरप्रायजेसला देण्याचे धोरण घेतले. केंद्र शासनाच्या मंजूर कोट्यानुसार साखर विकली तर नऊ कोटींचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे हा करार तातडीने रद्द करावा, असे निवेदनात म्हटले आहे.
...............
ही तर विरोधकांची स्टंटबाजी - नागवडे
३० ऑगस्टला साखर निर्यात करण्याबाबत संचालक मंडळाचे बैठक झाली. या बैठकीचा अजेंडा केशव मगर यांना देण्यात आला, पण ते गैरहजर राहिले. खरी माहिती न घेता विरोधकांनी स्टंटबाजी सुरू केली आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सांगितले. नागवडे म्हणाले, दोन लाख साखर पोती शिवम् एंटरप्रायजेसला देण्यावर चर्चा झाली, पण करार केला नाही. कारखान्याचे नुकसान होईल, असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. केशव मगर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही रिकामटेकडे हवेत गोळीबार करून दिशाभूल करीत आहेत, असा टोलाही नागवडे यांनी मारला.