पारनेर तालुक्यातील हंगा येथील हंगेश्वर मंदिर, पारनेर येथील नागेश्वर मंदिरासह बारा ज्योर्तीलिंग मंदिरे, सुपा संगमेश्वर मंदिर,भाळवणी नागेश्वर मंदिर, सिध्देश्वरवाडीतील सिध्देश्वर मंदिर, टाकळीढोकेश्वर येथील ढोकेश्वर मंदिरासह अनेक गावांमधील महादेव मंंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त यात्रौत्सव भरणार आहे.पारनेरचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात रोज चौदा ब्रम्हवृंदांव्दारे लघुरूद्राभिषेक सुरू आहे. हे अभिषेक करण्यासाठी राज्यातून भाविक येतात. चौथ्या सोमवारनिमित्त अभिषेकांची संख्या वाढली असून भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता नियोजन केल्याचे मंदिराचे गुरव योगेश वाघ यांनी सांगितले. पारनेर शहरात गावाच्या बाजूने बारा ज्योर्तीलिंगाची मंदिरे आहेत. तेथेही यात्रौत्सव होणार आहे.श्रावणात हंगा येथील हंगेश्वर मंदिरात तयार होणाऱ्या तांदळाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी राज्यातून भाविक येतात. यंदा भाविकांना दर्शन सुरळीत व्हावे म्हणून दर्शन रांगांची व्यवस्था केल्याचे विलास होले यांनी सांगितले. डोंगर दरीत असणारे पारनेरजवळील सिध्देश्वर मंदिर पुरातन मंदिर आहे. येथे सोमवारी यात्रौत्सव आहे. तालुक्यातील महादेव मंदिरातही यात्रौसव आहे.
श्रावण महोत्सव
By admin | Updated: August 17, 2014 23:33 IST