शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

सिंचन क्षेत्रात सात टक्क्यांनी वाढ

By admin | Updated: July 1, 2014 00:15 IST

अहमदनगर : राज्याच्या नकाशावर रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या नगर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात सिंचन क्षमतेत सात टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अहमदनगर : राज्याच्या नकाशावर रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या नगर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात सिंचन क्षमतेत सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे रब्बी ज्वारी, खरिपातील बाजरीच्या क्षेत्रात लक्षणीय घट आली आहे. सूक्ष्म सिंचनात सर्वाधिक वापर ठिबकचा होत आहे. ठिबक सिंचनावर ऊस, डाळिंब बागांचे प्रमाण वाढले असून दरवर्षी ठिबक सिंचनाचे क्षेत्र १२ ते १५ हेक्टरने वाढत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.जिल्ह्यात १ हजार ५८५ गावे असून खरीप हंगामाची ५७९ तर रब्बी हंगामाची १ हजार ६ गावे आहेत. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र १७.२ लाख हेक्टर असून लागवडीखाली क्षेत्र १३ लाख ५९ हजार आहे. खरीप हंगामासाठी ४ लाख १२ हजार तर उन्हाळी- रब्बी हंगामासाठी ७ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र आहे. कमी कालावधीत जास्तीतजास्त उत्पन्न मिळवून देणारे आणि नगदी पीक म्हणून ओळख असणाऱ्या सोयाबीन, कापूस, मका पिकांच्या क्षेत्रात अलीकडच्या पाच वर्षात मोठी वाढ झाली आहे. सुरुवातीला २० हजार हेक्टरच्या जवळपास कापसाचे क्षेत्र होते. त्यानंतर त्याची सरासरी ६० हजार हेक्टरपर्यंत पोहचली तर २०१३-१४ मध्ये दीड लाख हेक्टरपर्यंत कापसाचे क्षेत्र वाढत गेले. ३० हजार हेक्टरपर्यंत असणारे सोयाबीनचे क्षेत्र ७६ हजार हेक्टरपर्यंत पोहचले असून चारा पीक असणाऱ्या मका पिकाचे क्षेत्र ५६ हजार हेक्टर झाले आहे.जिल्ह्यात मुळा, भंडारदरा ही प्रमुख धरणे असून पुणे जिल्ह्यातील घोड, कुकडीचे पाणी श्रीगोंदा, पारनेर, कर्जत आणि जामखेडला मिळते. या शिवाय पाच ते सहा मध्यम प्रकल्प असून नाशिक आणि मराठवाड्यातून काही प्रमाणात शेतीला पाणी मिळते. पाच वर्षापूर्वी जिल्ह्याची सिंचन क्षमता २१ टक्के होती. आता त्यात वाढ झाली असून २८ टक्के सिंचन क्षमता झालेली आहे.यात लिप्ट इरिगेशन, शेततळी आणि प्रत्यक्ष सिंचनाचे प्रकार आहे. जिल्ह्यात दहा हजारांच्या जवळपास शेततळी असून त्यातील चार हजार शेतळ्यांची नोंद झालेली आहे. यातून समारे ५ हजार ५० हेक्टर क्षेत्र ओलिता खाली आहे. वांबोरी चारी, कालवे, तलाव, बंधारे यांच्या माध्यमातून विहिरींच्या पाणी क्षमतेत वाढ झालेली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण ठिबकचे असून १ लाख हेक्टर क्षेत्र ठिबकच्या माध्यमातून भिजवले जात आहे. दर वर्षी या क्षेत्रात १२ ते १५ हजार हेक्टरने वाढ होत आहे. विशेष करून उसासाठी ठिबकचे प्रमाण वाढले असून त्यातून मोठी पाणी बचत होत आहे. कापसासाठी ठिबक वापरण्याचा कल वाढला आहे.शेततळी आणि डाळिंब असे समीकरण झाले असून राहुरी, शेवगाव, नेवासा, संगमनेर, श्रीगोंदा, राहाता या तालुक्यात शेततळी, ठिबक आणि डाळिंबाच्या बागांचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र ६८ हजार हेक्टर असून त्यात १७ हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. (प्रतिनिधी)गत वर्षी जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर या पावसाच्या कालखंडात ४९५ मिमी सरासरीच्या तुलनेत ५१९ टक्के पाऊस झाला आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या १३५ टक्के पाऊस झालेला आहे. सर्वसाधारण माहिती खरिपाची गावे ५४९रब्बीची गावे १००६ पाटपाण्या खालील क्षेत्र ६५ हजार हेक्टर बागायत क्षेत्र २ लाख ६० हेक्टरजमिनीचे प्रकार हलक्या प्रतीची जमीन २४ टक्के मध्यम प्रकारची जमीन ३८ टक्केभारी काळी जमीन ३६ टक्केतांबडी जमीन २ टक्केपीकनिहाय क्षेत्रऊस १ लाख ६० हजार हेक्टरभाजीपाला पीक ३० ते ४० हजार हेक्टरचारा पिके ४० हजार हेक्टरकांदा पीक ७६ हजार हेक्टरफळबागा ६८ हजार हेक्टरमका ५६ हजार हेक्टर सोयाबीन ५६ हजार हेक्टर कापूस १ लाख हेक्टरच्या पुढे