अहमदनगर: नाशिक येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून २००९ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन देण्याचे काम सुरु असल्याची माहिती या कार्यालयाने दिली आहे. सदरचे काम पीपीओ क्रमांकाच्या ज्येष्ठतेच्या क्रमानुसार केले जाणार आहे. या कामाचे संगणकीकरण झालेले नसल्याने यासंदर्भात मुख्यालयाकडून सॉप्टवेअर प्राप्त झाल्यानंतर लगेचच जलदगतीने काम पूर्ण केले जाणार आहे. कार्यालयामार्फतच हे काम होणार असल्याने कुणी दलाल अथवा मध्यस्थ संपर्क साधत असेल तर त्यावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन या कार्यालयाने केले आहे.