शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

रणरागिणींचा रुद्रावतार

By admin | Updated: June 23, 2014 00:08 IST

दारुअड्डा उद्ध्वस्त : पारनेर पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर

पारनेर : दारू विक्रेत्यांकडून महिलांना येणाऱ्या धमक्या, विक्रेत्यांची दहशत व त्यांच्याविरुध्द पारनेर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने वाढलेली मद्यपींची संख्या या त्रासाला कंटाळून तालुक्यातील पिंपळगावरोठा गावातील महिलांनी शनिवारी रौद्ररूप धारण करून गावातील दारू अड्डे उद्ध्वस्त केले.तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथे तीन दारू दुकानांमधून अनेक वर्षांपासून दारू व्रिकी चालू आहे. ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव करूनही गावात दारूविक्री सुरूच राहिल्याने काही महिलांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या. तक्रारी केल्यानंतर दारू विक्रेत्यांवर कारवाईऐवजी महिलांवरच दारू विक्रेत्यांनी धमकीचे सत्र सुरू केले. महिलांना शिवीगाळदारू विक्रेत्यांनी शुक्रवारी महिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली. तसेच रोज अनेक घरांमध्ये पुरूषांचे दारू सेवनाचे प्रमाण वाढल्याने अनेक कुटुंबांमध्ये कलह वाढले. या सर्व घटनांना कंटाळलेल्या विमल पावडे, रोहिणी पावडे, कांताबाई पवार यांच्यासह गावातील इतर महिलांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत गाठले आणि दारूबंदीची मागणी केली. ग्रामपंचायतीने ‘आम्ही पोलिसांना वारंवार विनंती केली, परंतु त्यांच्याकडून कारवाई होत नसल्याचे सांगितले. ग्रामपंचायत व पोलीस काहीच करीत नसल्याने संतप्त महिलांनी आपला मोर्चा थेट दारू दुकानाकडेच वळविला. दुकानदारांना याची माहिती मिळताच त्यांनी दुकानाला कुलूप लावून धूम ठोकली. परंतु कोणत्याही परिस्थितीत दारू दुकान उद्ध्वस्त करण्याचा निर्धार केला आणि दुकानाचे कुलूप तोडून तेथील दारूसाठा ग्रामपंचायतीजवळ आणून उद्ध्वस्त केला. (तालुका प्रतिनिधी)आयुष्याची राखरांगोळी करणार का ?आमच्या अनेक कुटुंबात सध्या दारुमुळे भांडणे होतात. याचा महिलांना त्रास होतो. दारूची दुकाने सुरू ठेवून आमच्या आयुष्याची राखरांगोळी करायची काय? असा सवाल संतप्त महिलांनी केला.पिंपळगाव रोठा येथे महिलांनी एकत्र येऊन दारूअड्डे उद्ध्वस्त केले आहेत. पारनेर पोलिसांनी एका दारू विक्रेत्यावर कारवाई केली आहे. भविष्यातही तेथील दारू विक्रेत्यांवर कारवाई करू.शरद जांभळे, पोलीस निरीक्षक, पारनेरकैफियत मांडणारपिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा देवस्थान राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे. येथे मोठ्या प्रमाणावर रोज बाहेरील भाविक येतात. जर याच गावात दारूविक्री होत असेल आणि पोलीस कारवाईस टाळाटाळ करीत असतील तर ते निंदनीय आहे, अशी खंत या महिलांनी व्यक्त केली. या संदर्भात आपण जिल्हा पोलीस अधिक्षकांना भेटून कैफियत मांडणार असल्याचे त्या म्हणाल्या.