शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

पोलिसातील राम और शाम

By admin | Updated: June 20, 2014 00:37 IST

प्रमोद आहेर, शिर्डी नोकरीच्या निमित्ताने एकमेकांपासून दुरावलेले राम आणि शाम हे पोलीस अधिकारी योगायोगाने जिल्ह्यात प्रथमच एकत्र आले आहेत़

प्रमोद आहेर, शिर्डीनोकरीच्या निमित्ताने एकमेकांपासून दुरावलेले राम आणि शाम हे पोलीस अधिकारी योगायोगाने जिल्ह्यात प्रथमच एकत्र आले आहेत़ जिल्हा पोलीस दलातील राम और शाम या बंधूंमध्ये लहानपणापासून एकप्रकारे सुरू असलेली स्पर्धा आजही संपलेली नाही़सध्या राम विखेंच्या, तर शाम थोरातांच्या कर्मभूमीत कर्तव्य बजावत आहे.शामराव यादवराव सोमवंशी व रामराव माधवराव सोमंवशी ही सख्ख्या चुलत बंधूंची जोडी़ निफाड तालुक्यातील कोरमगाव या खेड्यातील हे दोघे बंधू वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत़ शेतकरी कुटुंबात असलेल्या या दोघा भावांनी गावात राहून शेतीच्या बांधावरून भांडत बसण्यापेक्षा शिक्षणाच्या माध्यमातून स्पर्धा केली़ दोघांनीही वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला़ शामरावने एमक़ॉम.पर्यंत मजल मारली, तर पाठोपाठ लहान असलेल्या रामरावनेही बीक़ॉम करुन कायद्याची पदवी मिळवली़ दरम्यान, शामरावने नाशिक गाठले व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन १९८९ मध्ये पोलीस दलात उपनिरीक्षक पद मिळवले़ पाठोपाठ रामरावनेही भावाचा कित्ता गिरवत नाशिक गाठले व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून १९९१ मध्ये उपनिरीक्षक पदाची वस्त्रे अंगावर चढवली़ यानंतर दोघांनाही यथावकाश बढत्या मिळत गेल्या़ एका ठिकाणावरुन दुसरीकडे, वेगवेगळ्या जिल्ह्यांत बदल्या होत गेल्या़ जबाबदाऱ्या व कामाच्या व्यस्ततेत एकत्र खेळत, बागडत, स्पर्धा करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदापर्यंत पोहोचलेल्या राम और शाम या जोडीचा संपर्कही विरळ होत गेला़ मात्र तब्बल वीस-बावीस वर्षानंतर दोघांना प्रथमच एकाच जिल्ह्यात नियुक्ती मिळाली़ इथेही योगायोगाने व स्पर्धेने त्यांची पाठ सोडली नाही़ एकाच खात्यात राहून एकमेकांशी निकोप स्पर्धा करत इथवर पोहचलेल्या राम और शामलाही एकाच पक्षात राहुन मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत असलेल्या दोन मातब्बर नेत्यांच्या मतदारसंघात नियुक्ती मिळाली आहे़ सध्या रामराव कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या शिर्डीत, तर शामराव महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमध्ये सेवा बजावत आहेत़ आता कोणाचे ‘साहेब’ मुख्यमंत्री होतात याबाबत या दोन बंधूंमध्ये उत्सुकता आहे.