पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव परिसरात पुन्हा एकदा वाळू चोरांनी डोकेवर काढले आहे. ही वाळू चोरी रोखण्यासाठी गुरुवारी दुपारी महसूल विभागाने पुनतगाव शिवारातील प्रवरा नदीपात्रात वाळू चोरांची एक बोट जाळण्यात आली.
सध्या नदीपात्रात पाणी असल्याने वाळू काढण्यासाठी जागा नाही. त्यामुळे वाळू चोर बोटीचा (थर्माकॉल तराफा) वापर करत आहेत. पाण्यातून काढून ती तरफेद्वारे काठावर साठवून ठेवली जात होती. नंतर अन्य मोठ्या वाहनातून त्या वाळूची विक्री करण्यात येत होती. गुरुवारी महसूल विभागाकडून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने थेट नदीपात्रात कारवाई करत ही बोट जाळण्यात आली. मात्र तस्करांनी ही बोट अर्धवट जळालेल्या अवस्थेत ती विझवून खुपटी शिवारात ओढून नेली. पाचेगाव, पुनतगाव येथील प्रवरा नदीपात्रात कायम पाणी असल्याने वर्षांपासून वाळू तस्करांनी बोटीने (थर्माकॉल तरफा) वाळू उचलण्याचा नवीन फंडा अमलात आणला आहे. तहसीलदार रूपेश सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली पुनतगावचे तलाठी गणेश जाधव आणि ग्रामस्थ यांनी कारवाई केली.
-----
१९ पुनतगाव
पुनतगाव येथील नदीपात्रात महसूल विभागाने उडविलेली बोट.