देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व त्यांचे पती देवीसिंह शेखावत यांनी रविवारी साईदरबारी हजेरी लावली़ दर्शनानंतर त्यांनी तब्बल एक तासाहून अधिक काळ मंदिराच्या व्हीआयपी कक्षात व्यतित केला़ दरम्यान येथेच त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी अर्धा तास चर्चा केली़ दोन दिवसांपूर्वी धुळ्याला गेलेल्या प्रतिभातार्इंनी पुण्याला परतताना येथील विश्रामगृहावर मुक्काम केला़ रविवारी (दि़२५) सकाळी त्यांनी पती देवीसिंह शेखावत यांच्यासह साईदरबारी हजेरी लावली़ यावेळी त्यांच्याहस्ते पाद्यपूजा करण्यात आली़ प्रतिभातार्इंच्या दर्शनाच्या वेळी काहीकाळ दर्शनरांग बंद ठेवण्यात आली होती़
प्रतिभाताई पाटील साईदरबारी...
By admin | Updated: May 26, 2014 00:27 IST