एका व्यक्तीने शहर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक देशमुख याच्याकडे होता. तक्रार देणाऱ्या व्यक्तीची पत्नी मिळून आल्याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार बंद केल्याने देशमुख याने संबंधित व्यक्तीकडे एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर या व्यक्तीने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. या विभागाचे पोलीस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, पोलीस निरीक्षक प्रशांत सपकाळे यांनी सापळा रचला. लाच मागणाऱ्या देशमुख याला शनिवारी लाच देण्याचे ठरले. तक्रारदार व्यक्तीकडून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एक हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या देशमुख याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पोलीस नाईक एकनाथ बाविस्कर, पोलीस नाईक प्रकाश महाजन, पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे आदींनी ही कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पोलीस ठाण्यातच लाच घेताना पोलीस नाईक चतुर्भुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:36 IST