शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

काळे कारखान्यात भूखंड घोटाळा

By admin | Updated: May 27, 2014 00:27 IST

कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची जमीन भाडेपट्टयाने खासगी शिक्षण संस्थेला विना मोबदला देवून सत्तेचा दुरूपयोग झाला

कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची जमीन भाडेपट्टयाने खासगी शिक्षण संस्थेला विना मोबदला देवून सत्तेचा दुरूपयोग झाला असल्याचा आरोप स्वाभिमानी विकास आघाडीचे नितीनराव औताडे यांनी केला आहे़ जवळपास ३५ कोटींच्या या भूखंड घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे़ नितीन औताडे, अशोकराव रोहमारे व दिलीपराव लासुरे यांनी साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोपरगाव कारखाना व्यवस्थापन मंडळाने २८ जून २०१३ रोजी सर्वसाधारण सभेत शैक्षणिक व सार्वजनिक कामासाठी बक्षिसपत्राने दिलेल्या जमिनीस अंतिम मान्यता देण्याचा विषय घेतला होता़ यात जमिनीचे क्षेत्र, आकार, ठिकाण, जमिनी नक्की कुणाला बक्षिसपत्राने दिली, याचा कुठेही उल्लेख नव्हता़ वास्तविक कारखाना व्यवस्थापनाने सर्वसाधारण सभेच्या अगोदरच सभासदांच्या मालकीची शहाजापूर येथील १३़६३ आर, सुरेगाव येथील ३़७५ आर अशी एकूण १७ हेक्टर ३८ आर जमिन शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी गौतमनगर या काळे कुटुंबीयांच्या खासगी ट्रस्टच्या नावे केली होती. या जमिनीचे बाजारमूल्य ३० ते ३५ कोटीच्या आसपास आहे़ ही शैक्षणिक संस्था कारखान्याचे अध्यक्ष आ़ अशोक काळे यांच्या वडिलांच्या नावे असून त्या संस्थेवर त्यांच्याच कुटुंबाचे वर्चस्व आहे़ नऊ हजार सभासदांच्या मालकीच्या कारखान्याची जमीन सभासदांच्या डोळ्यात धूळ फेकून हडप करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. कारखान्याने स्वमालकीची जमीन विना मोबदला काळे कुटुंबाच्या शिक्षण संस्थेला देवून पुन्हा कारखान्यानेच भाडेपट्टयाने घेणे हास्यास्पद आहे, असे औताडे यांचे म्हणणे आहे़ कारखाना व्यवस्थापनाची साखर आयुक्तांनी चौकशी करावी, अन्यथा कारखाना व्यवस्थापन व साखर आयुक्तांविरूद्ध औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही औताडे यांनी दिला आहे़ (प्रतिनिधी)काळे साखर कारखान्यात ३५ कोटी रूपयांचा भूखंड घोटाळा झाला, असल्याच्या आरोपावर कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीष जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, साखर आयुक्तांकडे कोणी काय तक्रार केली हे आपणास माहीत नाही़ परंतु जी तक्रार केली असेल, त्याची चौकशी संबंधित यंत्रणा करेल़ आम्ही चौकशीस सामोरे जाऊ़