अहमदनगर : यंदाचा गौरी गणपती उत्सव गृहिणींना त्यांची कल्पकता खुलविण्यास व भावुकत्व प्रदर्शित करण्यात वाव देणार आहे. लोकमत सखी मंचच्या वतीने ‘महालक्ष्मी’ सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरिता चंदुकाका सराफ अॅण्ड सन्स प्रा.ली. हे गिफ्ट प्रायोजक आहेत.महालक्ष्मी सजावट उत्कृष्ट करून आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे.सखी मंच सदस्यांकरिता नि:शुल्क प्रवेश तर इतर महिलांना या स्पर्धेकरिता रू. १०० प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे. आपण सजविलेल्या महालक्ष्मी आरासचे ४ बाय ६ आकाराचे रंगीत छायाचित्र दिनांक १७ सप्टेंबर २०१६ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत लोकमत भवन, पत्रकार चौक, सावेडी रोड येथे आणून द्यावे.स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८५०२६४२०० या क्रमांकावर संपर्क साधवा.
महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे आयोजन
By admin | Updated: September 7, 2016 00:36 IST