अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी फक्त ९९ जण नवे कोरोना बाधित आढळले, तर १७० रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार २२६ इतकी झाली आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०१३ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४६ आणि अँटिजन चाचणीत १४ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर (३०), अकोले (६), जामखेड (१), कोपरगाव (२), नगर ग्रामीण (५), नेवासा (५), पारनेर (११), संगमनेर (६), शेवगाव (२), श्रीगोंदा (१), मिलिटरी हॉस्पिटल (२), राहाता (४), श्रीरामपूर (६), कर्जत (२), कोपरगाव (५), अशा रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत १ हजार ४८ जणांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णसंख्या ६९ हजार २८७ इतकी आहे.