पारनेर : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी राजीनामा दिल्यानंतर तासाभरातच वेगवान घडामोडी घडून पारनेर बाजार समितीचे सभापती काशीनाथ दाते यांची राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. उद्या सोमवारी त्यांना अधिकृत पत्र देण्यात येणार आहे. दादा कळमकर यांच्यानंतर पारनेरला पुन्हा संधी मिळाली आहे. काशीनाथ दाते यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळीच पारनेर तालुकाध्यक्षपद अनेक वर्षे सांभाळले होते. त्यानंतर पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य पद व आता गेली सात वर्षे पारनेर बाजार समितीचे सभापतीपद ते भूषवित आहेत. त्यांनी राज्यात बाजार समितीचा नावलौकीक वाढविला. राष्ट्रवादीत २००४ विधानसभा निवडणुकीत त्यांनी तत्कालिन आमदार वसंतराव झावरे यांच्या विरोधात दंड थोपटून नंतर शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्यांचे मन शिवसेनेत कधीच रमले नाही. त्यांनी तीन वर्षापूर्र्वी शिवसेनेतून पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गटाचे ओळखले जात होते. लोकसभा निवडणुकीत राजीव राजळे यांच्या प्रचाराची धुरा त्यांनीच सांभाळली होती. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य सुजीत झावरे यांच्या गटाचा प्रखर विरोध त्यांना सध्या तालुक्यात सोसावा लागत होता. आता दाते यांची थेट जिल्हाध्यक्षपदीच निवड झाल्याने झावरे गटाला शह मानला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)सख्खे शेजारीराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यावर काशीनाथ दाते व सुजीत झावरे हे पक्षातील अंतर्गत विरोधक असले तरी आता ते सख्खे शेजारी होणार आहेत. नगरचे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यालय व सुजीत झावरे यांचे कार्यालय हे शेजारी-शेजारीच आहे. त्यामुळे दाते व झावरे हे दररोज आपआपल्या कार्यालयातून काम पहात असताना शेजारीच असणार आहेत.वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवूराष्ट्रवादीचे नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार,पालकमंत्री मधुकर पिचड, बबनराव पाचपुते यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी माझ्यावर टाकलेली जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळताना वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरविणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे.- काशीनाथ दाते, नूतन जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस नगर जिल्हा.
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी दाते
By admin | Updated: June 23, 2014 00:09 IST