शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

‘आई राजा उदो उदो’च्या गजरात मोहटादेवीची घटस्थापना

By admin | Updated: October 2, 2016 00:59 IST

पाथर्डी : तालुक्यातील मोहटादेवी गडावर शनिवारी सकाळी देवस्थानच्या अध्यक्षा तथा जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्याहस्ते उत्साहाच्या मंगलमय वातावरणात तसेच मंत्रोच्चाराच्या जयघोषात घटस्थापना झाली.

पाथर्डी : तालुक्यातील मोहटादेवी गडावर शनिवारी सकाळी देवस्थानच्या अध्यक्षा तथा जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्याहस्ते उत्साहाच्या मंगलमय वातावरणात तसेच मंत्रोच्चाराच्या जयघोषात घटस्थापना झाली. यावेळी उपस्थित भाविकांनी जय मातादीच्या घोषणा दिल्या. पाऊस असतांनाही सकाळपासून भाविक मोठया संख्येने गडावर आले होते.सकाळी मोहटा गावातून देवीच्या मुखवटयाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी देवीला सुवर्णालंकार घालण्यात आले. मिरवणुकीत शाळकरी मुले-मुली तसेच गावातील व परिसरातील नागरिक मोठया संख्येने हजर होते. सकाळी अकराच्या सुमारास देवस्थानच्या अध्यक्षा सुवर्णा केवले यांच्या हस्ते विधीवत पूजा करून घटस्थापना झाली. देवस्थानचे पुजारी बबन देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पौरोहित्य केले. यावेळी विश्वस्त अरूण वराट,प्रसन्न दराडे,गोरक्ष ओव्हळ, बाबासाहेब दहिफळे ,रामकिसन फुंदे, शुभांगी खाडे आदींसह मोठया संख्येने भाविक हजर होते. मोहटादेवी गडावर पायी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पायी येणाऱ्या भाविकांची सेवा करण्यासाठी शहरातील मंडळे सज्ज झाली आहेत. भाविकांसाठी मोफत चहा व फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. मोहटादेवी गडाबरोबर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील धामणगांव देवी, शहरातील तिळवण तेली समाजाची देवी , चौंडेश्वर देवी, गाडगे आमराई आदींसह तालुक्यातील विविध गावात घटस्थापना मोठया उत्साहात करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान समितीने सर्व नियोजन केले आहे. दर्शनबारीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर परीसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. भाविकांना प्रसादाची व्यवस्था केली आहे. नऊ दिवस गडावर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. -सुवर्णा केवले, अध्यक्षा, मोहटादेवी देवस्थान.केडगावच्या रेणुकामाता देवी मंदिरात घटस्थापनाकेडगाव : नगरकरांचे श्रद्धास्थान असलेल्या केडगाव येथील रेणुकामाता मंदिरात आज भक्तिभावाने धार्मिक विधिवत घटस्थापना करण्यात आली. नवरात्रेची पहिली माळ असूनही देवी भक्तांच्या पहाटेपासूनच दशर्नासाठी रांगा होत्या.येथील देवी मंदिरात शनिवारी सकाळी नगरसेवक सुनील कोतकर व त्यांच्या पत्नी रोहिणी कोतकर यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. यानंतर भवानी गुरव व कालभैरवाची पूजा करण्यात आली. कोतकर दांम्पत्याने ध्वजपूजन केले. त्यानंतर धार्मिकविधीने घटस्थापना झाली. मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी गुरव कुटुंबीय, बाबासाहेब कोतकर, माजी सरपंच रघुनाथ लोंढे, दीपक कोतकर आदी उपस्थित होते. पहिली माळ असूनही आणि सकाळपासून पावसाची संततधार असतानाही भाविकांनी पहाटेपासूनच दशर्नासाठी गर्दी केली होती. जास्त गर्दीतही दर्शन घेता यावे, यासाठी देवस्थान समितीने मुखदशर्नाची सोय केली आहे. मंदिरात रोज पहाटे साडे चार व रात्री साडे नऊला देवीची आरती होणार आहे. शनिवारी (दि. ८) सातव्या माळेला देवीची यात्रा आहे.(वार्ताहर)