पाथर्डी : हंडाळवाडी शिवारात मोहरी रोडवर असलेल्या नवोदय निवासी मतिमंद बालगृहातून संजय नावाचा १३ वर्षांचा अनाथ मुलगा गुरुवारपासून गायब झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे़ विद्यालयाचे शिक्षक दत्तात्रय कोलते यांच्या माहितीवरुन पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, गुरुवारी (दि.२२) दुपारी एकच्या सुमारास जेवणासाठी बाहेर असलेल्या भोजन कक्षात मुलांना सोडण्यात आले होते़ जेवायला गेलेला संजय नावाचा मूकबधिर विद्यार्थी त्या ठिकाणाहून परत आलाच नाही. विद्यालयाच्या शिक्षक व इतर कर्मचार्यांनी मोहटागाव व हंडाळवाडी परिसरात त्याचा शोध घेतला़ मात्र तो आढळून आला नाही. संजय हा अनाथ व मूकबधिर विद्यार्थी आहे. पोलिसांनी शिक्षक कोलते याच्या खबरीवरुन मिसिंगचा गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
बालगृहातून अल्पवयीन मुलगा गायब
By admin | Updated: May 24, 2014 00:38 IST