बिबट्याने मांडी व पोटरीवर नख्यांचे तीक्ष्ण वार केले आहेत.
प्रवरा परिसरात बिबट्यांचे हल्ले नित्य झाले आहेत. या परिसरात बिबट्यांच्या मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. शेतात काम करताना रस्त्याने फिरणाऱ्यांवर बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. बेलापूर, केसापूर, आंबी, अंमळनेर हा भाग बागायती पट्टा असल्याने उसाचे मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे बिबट्यांना आयती लपण मिळते आहे. बिबटे मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या, वासरे, कुत्री या पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना भक्ष्य बनवीत आहेत. गेल्या काही दिवसांत मनुष्यांवर बिबट्यांचे हल्ले वाढल्याने या नरभक्षक बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवरा पंचक्रोशीतून होत आहे. वन विभागाने परिसरात अजून दोन ते तीन पिंजरे लावावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.