शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयातील पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमाच्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक कवी प्रा. पोपट सातपुते, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, मधुसूदन नावंदर, ज्येष्ठ पत्रकार किसनभाऊ हासे, पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रा. डॉ. संतोष खेडलेकर, प्रा. सुशांत सातपुते आदी उपस्थित होते. डॉ. मालपाणी यांच्या हस्ते गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात डॉ. अनुश्री खैरे यांनी ८८.२८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला तर सुविधा सालपे यांनी ८८ टक्के गुण मिळवून द्वितीय तर जिजाबा हासे यांनी ८७.४२ टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
__
फोटो -१४ पत्रकार सत्कार
ओळ : पदव्युत्तर वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमाच्या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करताना डॉ. संजय मालपाणी.