शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

जपानी उद्योजकांना सुप्याची उत्सुकता

By admin | Updated: June 20, 2014 00:37 IST

अहमदनगर : सुपा येथील औद्योगिक वसाहतीत उद्योग सुरू करण्यास जपानचे उद्योजक इच्छुक आहेत़ औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकताच जपान दौरा पूर्ण केला

अहमदनगर : सुपा येथील औद्योगिक वसाहतीत उद्योग सुरू करण्यास जपानचे उद्योजक इच्छुक आहेत़ औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकताच जपान दौरा पूर्ण केला असून, याविषयी जपानच्या उद्योजकांशी चर्चा झाली़ चर्चेदरम्यान जपानी उद्योजकांनी उद्योग सुरू करण्याची इच्छा अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली आहे़ त्यामुळे सुपा औद्योगिक वसाहतीला ‘अच्छे दिन येणार’ असल्याचे बोलले जात आहे़सुपा औद्योगिक वसाहतीत विस्तारीकरणाच्या जोरदार हालचाली सुरू आहेत़ नवीन औद्योगिक धोरणानुसार शेतकऱ्यांच्या जमीनीला वाढीव दर जाहीर करण्यात आला आहे़ वाढीव दराने जमिनी खरेदी करण्याची अधीसूचना जारी करण्यात आली असून, औद्योगिक विकास महामंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत़ नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत़ काही शेतकऱ्यांनी जमिनी देण्याची तयारी दर्शविली़ तर सुमारे १५ शेतकऱ्यांनी हारकती नोंदविल्या आहेत़ त्यावर प्रशासनाकडून सुनावणी घेण्यात येत आहे़ राज्य शासन व जपानी उद्योजकांशी तसा करारही झाला आहे़ या पार्श्वभूमीवर औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी डॉ़ पी. अन्बलगन यांच्यासह नाशिक येथील कार्यकारी अधिकारी रामदास खेडकर यांनी नुकताच जपानचा दौरा पूर्ण केला़ दौऱ्यात त्यांनी तेथील निवडक उद्योजकांशी चर्चा केली़ चर्चेदरम्यान जपानी उद्योजकांनी जागा उपलब्ध करून दिल्यास उद्योग सुरू करण्याची तयारी दर्शविली़ जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन भूखंड ताब्यात आल्यास जपानी क्लस्टर सुरू होईल, अशी अपेक्षा खेडकर यांनी व्यक्त केली़नगरच्या उद्योगाला कमालीची मरगळ आली आहे़ मोठे उद्योग बंद पडले आहेत़ त्यामुळे छोट्या उद्योजकांना काम नाही़ कामासाठी छोटे उद्योजक बड्या कंपन्यांच्या प्रतीक्षेत आहेत़ जपानी उद्योग क्लस्टर सुपा येथील औद्योगिक वसाहतीत प्रस्तावित आहे़ वरिष्ठ पातळीवर याविषयीच्या जोरदार हालचाली सुरू असून, अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे़ अधिकाऱ्यांचा पहिला दौरा पूर्ण करण्यात आला असून, जमिनी ताब्यात घेण्याची मोहीत महामंडळाने उघडली आहे़ नगर जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे़ सुपा येथील औद्योगिक वसाहतीत जपानचे क्लस्टर सुरू करण्याबाबत करार झाला आहे़ या पार्श्वभूमीवर जपानचा नुकताच दौरा केला़ यावेळी विविध उद्योजकांशी चर्चा केली असून,सुपा येथे उद्योग सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे़ त्यामुळे जपानी उद्योजकांची तयारी आहे़ केवळ शेतकऱ्यांची जागा देण्याची मानसिकता हवी़ जागा ताब्यात आल्यास मोठे उद्योग नगरमध्ये येतील़- रामदास खेडकर, कार्यकारी अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळ