शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

नगरच्या औद्योगिक प्रश्नी उद्योग मंत्र्यांची भेट घेणार

By admin | Updated: May 24, 2014 00:40 IST

अहमदनगर : नगरच्या औद्योगिक वसाहतीत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यात जे प्रश्न जिल्हाधिकार्‍यांशी निगडित आहेत ते तातडीने सोडवू.

अहमदनगर : नगरच्या औद्योगिक वसाहतीत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यात जे प्रश्न जिल्हाधिकार्‍यांशी निगडित आहेत ते तातडीने सोडवू. मात्र, मंत्रीस्तरावर असणार्‍या प्रश्नांबाबत उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योजक आणि आमी संघटनेच्या शिष्टमंडळाने मंत्री थोरात यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीपूर्वी थोरात यांना विविध सामाजिक संघटना यांचे निवेदन स्वीकारत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यात खंडकर्‍यांच्या जमिनीचा विषय, विडी कामगारांचे प्रश्न, यतिमखाना आदी समस्यांचे निवेदन स्वीकारत जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना त्याप्रश्नी लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. आमी संघटनेच्यावतीने मिलिंद कुलकर्णी, दौलत शिंदे आणि अशोक सोनवणे यांनी औद्योगिक विकास महामंडळाचे क्षेत्रीय कार्यालय नाशिक येथील क्षेत्रीय कार्यालयाशी संलग्न आहे. हे सर्व उद्योजकांना असुविधाकारक आहे. त्याऐवजी नगरला प्रादेशिक कार्यालय सुरू व्हावे. औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांचे चौपदरीकरण व्हावे. निंबळक रस्त्यावर रेल्वेगेट जवळ उड्डाणपूल व्हावा, एमआयडीसीत पाणी टंचाई आहे. वारंवार पाण्याची पाईप लाईन फुटत असून मुळा धरणापासून एमआयडीसीपर्यंतच्या पाईप लाईनची दुरूस्ती व्हावी. सेल्स टॅक्स, एक्साईज विभाग, इन्कम टॅक्स विभाग, याची सर्व कार्यालये नगर येथे असावीत. सेंट्रल एक्साईज विभागाला नगरसाठी पूर्ण वेळ आयुक्त नेमावा. सुपा एमआयडीसीतील रिकामे प्लॉट उद्योजकांना द्यावेत यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. त्यावर जिल्हास्तरावरील प्रश्न जिल्हाधिकार्‍यांनी सोडवावेत, उर्वरित प्रश्नाबाबत उद्योग मंत्री राणे यांची भेट घेण्याचे आश्वासन यावेळी दिले. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा परिषद सदस्य सत्यजीत तांबे, माजी आ. शिवाजी नागवडे, शहरजिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा, सरचिटणीस अनंत देसाई, सचिन गुजर, जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे यांचेसह कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)बक्कर कसाब जमातच्या वतीने त्यांना ओबीसी दाखले मिळविताना येणार्‍या अडचणींचा पाढा वाचला. यात त्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात करण्यात आलेला आहे. मात्र, जुने दाखले मिळत नसल्याने राज्य सरकारने गृहचौकशी करून या समाजातील व्यक्तींना दाखले देण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. शहरातील दोन मटण मार्केटची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. या ठिकाणी पाणी आणि गटारीची सुविधा नाही. मटण व्यावसायिकांना मटण विक्रीचे परवाने मिळवितांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मनपा आयुक्तांसोबत एकत्रित बैठक घेण्याचे आश्वासन मंत्री थोरात यांनी दिले. यावेळी मिराबक्ष अल्लाबक्ष, शौकत बादशाह, शब्बीर युसूफ, गफ्फार कादर आदी उपस्थित होते. वाडिया पार्क गाळेधारकांनी मंत्री थोरात यांची भेट घेत गाळेधारकांना झालेला दंड आणि व्यापारी गाळ्यासंदर्भात महापालिकेने योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती केली. सध्या या प्रकरणी उच्च न्यायालयात खटला सुरू असून महापालिकेने या ठिकाणी झालेले अतिरिक्त बांधकाम आणि पार्किंगच्या जागेबाबत अडचण नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याची मागणी केली. यावेळी मोहम्मद हनिफ गफ्फार शेख आणि अरूण पेटकर यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित होते.