बुधवारी (दि. २६) संध्याकाळी सहाच्या सुमारास संगमनेर शहरातून जाणाऱ्या जुन्या नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील एका घरासमोर टपरीच्या आडोशाला कारवाई करण्यात आली. या कारवाईत ९०० रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची आंबट उग्र वासाची प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरलेली दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी सचिन दादू जाधव (वय २६, रा. पुनर्वसन कॉलनी, घुलेवाडी, ता. संगमनेर) याच्याविरोधात पोलीस नाईक राजेंद्र महादेव पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार शिवाजीराव फटांगरे हे अधिक तपास करीत आहेत.
बुधवारी (दि. २६) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास संगमनेर खुर्द शिवारातील वैदूवाडी परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत ३ हजार १२० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ६० बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी संदीप तया शिंदे (वय २१, रा. वैदुवाडी, संगमनेर) याच्याविरोधात पोलीस कॉन्स्टेबल अविनाश अशोक बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार अमित महाजन हे अधिक तपास करीत आहेत.
बुधवारी (दि. २६) रात्री आठच्या सुमारास संगमनेर खुर्द शिवारातील वैदूवाडी परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत २ हजार ४९६ रुपये किमतीच्या देशी दारूच्या ४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. राजू रामा लोखंडे (वय ४२, रा. वैदुवाडी, ता. संगमनेर) याच्याकडून या बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याच्याविरोधात पोलीस कॉन्स्टेबल महादेव रामचंद्र हांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक नीलेश धादवड अधिक तपास करीत आहेत.
बुधवारी (दि. २६) रात्री साडेआठच्या सुमारास संगमनेर खुर्द शिवारातील वैदूवाडी परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत १ हजार ३०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ५० बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी सपना गणेश महाले (रा. वैदुवाडी, संगमनेर) या महिलेविरोधात पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत उद्धव वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक विजय पवार अधिक तपास करीत आहेत.