शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

हौशी नगरकर गेले फिरायला...

By admin | Updated: May 26, 2014 00:27 IST

अहमदनगर : शिर्डी, भंडारदरा, कळसुबाई, मढी, सिद्धटेक आदी निसर्ग आणि धार्मिक पर्यटनाची ठिकाणे असलेल्या नगर जिल्ह्यातून बाहेरच्या राज्यात जाणार्‍या हौशी नगरकरांचीही संख्या काही कमी नाही.

अहमदनगर : शिर्डी, भंडारदरा, कळसुबाई, मढी, सिद्धटेक आदी निसर्ग आणि धार्मिक पर्यटनाची ठिकाणे असलेल्या नगर जिल्ह्यातून बाहेरच्या राज्यात जाणार्‍या हौशी नगरकरांचीही संख्या काही कमी नाही. धकाधकीच्या जीवनात असलेला कामाचा तणाव, कुटुंबातील अंतर्गत कलह, कार्यालयातील दगदग यातून सुटका करून घेत मोकळ्या वातावरणात बागडणारे हौशी नगरकर वर्षातून किमान दोनवेळा पर्यटनासाठी घराबाहेर पडतात. आनंदाचे दोन क्षण जगण्याकरिता पर्यटनाला जाण्याचा पर्याय सर्वात जवळचा वाटतो आहे. कामाचा ताण असलेला नोकरदार आणि व्यापारीवर्ग वर्षातून २ ते ३ वेळा सहकुटुंब पर्यटनाला जाण्यावर भर देत आहे. टूर प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट करून देणार्‍या कंपन्या मोठ्या प्रमाणात काम करीत आहेत. परंतु तरीही कुटुंबासमवेत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत प्लॅनिंग करुन पर्यटनाला जाण्यावर अनेकांकडून भर दिला जात आहे. २पर्यटन कंपन्यांतर्फे टूरला जाणार्‍यांमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नवविवाहितांची संख्या सवार्धिक आहे. भारताबाहेर जाणारे पर्यटक पर्यटन कंपन्यांतर्फे जात आहेत. अंतर्गत पर्यटनाला इंटरनेटच्या माध्यमातून थेट प्लॅनिंग करून बाहेर पडत आहे. सहकुटुंब सामान्यांमध्ये पर्यटनाविषयी असलेली ओढ जाणून घेण्याचा 'लोकमत'ने प्रयत्न केला. त्यातून ६५ टक्के नागरिक वषार्तून दोन ते तीन वेळा पर्यटनाला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच, वैयक्तिक किंवा मित्र-मैत्रिणींसोबत पर्यटनाला जाण्यापेक्षा सहकुटुंब जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. शनिवार, रविवार असे जोडून पर्यटनाला जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. असे दोन दिवस जोडून चार किंवा पाच दिवसांचे पर्यटन प्लॅनिंग करण्यावरच नगरकरांचा भर आहे. ३कामाच्या ताणातून वेळ काढून माइंड फ्रेश करण्याचा हा फंडा प्रत्येकालाच उपयुक्त ठरत आहे. बाहेरगावी जाऊन आल्यानंतर काम करताना मिळणारी शक्ती कित्येक दिवस साथ देत असल्याने पर्यटनाला जाणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. व्यापारीवगार्चे व्यवहार बुधवारी बंद असतात. त्यामुळे व्यापारी त्या दिवशी जवळचे पर्यटनस्थळ निवडतात. नगर ते पुणे आणि पुणे येथून जवळ असलेल्या पर्यटनस्थळांना व्यापारी वर्गाने पसंती दिली आहे. पर्यटनकरिता तीन महिन्यांतून २ ते ३ दिवस काढण्याचा प्रयत्न अनेक जण करीत असल्याचे दिसून आले आहे. तर, लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाण्याकरिता आठवडाभर वेळ ठेवणारा वर्गही थोड्या प्रमाणात आहे. धकाधकीच्या जीवनात असलेले कामाचे टेन्शन आणि कु टुंबातील अंतर्गत कलहांचा त्रास यातून मोकळ्या वातावरणात आनंदाचे दोन क्षण जगण्याकरिता पर्यटनाला जाण्याचा पर्याय सध्या निवडला जात आहे. विद्यार्थिवगार्पेक्षा रोजच्या कामाचा ताण असलेला नोकरदार आणि व्यापारीवर्ग वषार्तून २ ते ३वेळा सहकुटुंब पर्यटनाला जाण्यावर भर देत असल्याचे दिसून आले आहे. तरुण वर्गात उत्सुकता, कुतूहल, अभ्यास, निसर्गज्ञान, इतिहासशिक्षण यानुसार पर्यटनाला प्राधान्य दिले जात आहे. गणपतीपुळे, पावस, अक्कलकोट, गोंदवले, औंध, महाबळेश्वर, लोणावळा, मालवण-सिंधुदुर्ग, आनंदसागर अशा राज्यांतर्गत ठिकाणांना पसंती दिली जात आहे.