शेवगाव : तालुक्यातील भायगाव, भातकुडगाव फाटा, गुंफा, खामगाव, हिंगणगाव-ने, जोहरापूर तसेच परिसरातील आठ ते दहा गावात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार वृष्टी झाली. तसेच शेवगाव परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.बोधेगाव, बालमटाकळीसह पूर्वभाग पावसापासून कोरडा होता. पावसाने सुमारे अडीच ते पावणेतीन महिने ओढ दिल्याने तालुक्यात दुष्काळाचे सावट होते. पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्नही बिकट बनला आहे. तसेच वाढत्या भारनियमनामुळे तालुक्यात शेतीसह सर्वच क्षेत्राचे अर्थकारण ठप्प झाले आहे.दीर्घकाळ पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या भातकुडगाव, गुंफा परिसरातील शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. पावसामुळे शेतबांध, ओढे, नाल्यांना यंदा प्रथमच पाणी वाहिले. याच परिसरातील गावांमधील पिकांचे एप्रिलअखेर झालेल्या गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले होते. रब्बी पेरणीसाठी आणखी पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.(तालुका प्रतिनिधी)
शेवगाव तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी
By admin | Updated: August 24, 2014 23:08 IST