श्री साईचरित्र पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे ८ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह दरम्यान दररोज पहाटे काकड भजन, सकाळी ८ ते ११ साईसचरित्र पारायण, सायंकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान प्रख्यात महाराजांचे कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प.पू.महंत रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. या सोहळ्याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन नगरसेवक दत्तात्रय कोते व सप्ताह कमिटीने केले आहे.
ध्वजारोहणप्रसंगी नगरसेवक दत्तात्रय कोते तसेच सप्ताह कमिटीचे पोपट वाणी, कचरू सोनवणे, सुधाकर भालेराव, बबन गुंजाळ,ज्ञानेश्वर पवळे, ताराचंद भालेराव आदी गणेशवाडी ग्रामस्थ व महिला यांनी पूजन केले.