शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

अपंगांच्या रेशीमगाठींना सरकारचे कन्यादान

By admin | Updated: June 20, 2014 00:37 IST

मिलिंदकुमार साळवे , श्रीरामपूर अपंगांशी रेशीमगाठी जुळल्यानंतर त्यांची वीण अधिक घट्ट करण्यासाठी राज्य सरकार अपंग व अपंग नसलेल्या अशा जोडप्याच्या रेशीमगाठींसाठी ५० हजारांचे कन्यादान करणार आहे.

मिलिंदकुमार साळवे , श्रीरामपूरअपंगांशी रेशीमगाठी जुळल्यानंतर त्यांची वीण अधिक घट्ट करण्यासाठी राज्य सरकार अपंग व अपंग नसलेल्या अशा जोडप्याच्या रेशीमगाठींसाठी ५० हजारांचे कन्यादान करणार आहे.अपंगांना सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे कौटुंबिक जीवन जगता यावे, यासाठी अपंग व अपंगत्व नसलेल्या व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन दिल्यास अपंगांशी अपंग नसलेल्या व्यक्ती लग्नगाठ बांधण्यास प्रोत्साहीत होतील, यासाठी आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर अपंग व अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तीशी अपंगत्व नसलेल्या व्यक्तीने विवाह केल्यास त्या जोडप्यास आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याच्या धर्तीवर आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. १ एप्रिल २०१४ या आर्थिक वर्षापासून नव्याने विवाहित होणाऱ्या जोडप्यांना ही योजना लागू केली आहे. किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या वधू किंवा वराने अपंगत्व नसलेल्या जोडीदाराशी विवाह केल्यास अथवा अपंग नसलेल्या वधू किंवा वराने अपंग असलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास अर्थसहाय्य मिळेल. त्यानुसार २५ हजार रूपयांचे बचतप्रमाणपत्र, २० हजार रूपये रोख, संसारोपयोगी साहित्य, वस्तू खरेदीसाठी ४५०० रूपये ,स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाचा खर्च करण्यासाठी ५०० रूपये असे एकूण ५० हजार रूपये मिळणार आहे. मुंबईत सहायक समाजकल्याण आयुक्त, तर इतर जिल्ह्यांसाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांमार्फत योजना राबविली जाईल़ त्यासाठी या कार्यालयातील नमुना अर्ज भरून द्यावा लागणार आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात प्राप्त होणारे अर्ज, त्या आर्थिक वर्षात वर्षातून दोनदा निकाली काढले जाणार आहेत. १ एप्रिलपासून होणार अंमलबजावणीया योजनेंतर्गत १ एप्रिल २०१४ पासून लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार असून निधीच्या उपलब्धतेनंतरच योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. लाभार्थ्याने योजनेचा दोनदा लाभ घेऊ नये, यासाठी लाभार्थ्यांनी सादर केलेला विवाह नोंदणी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अपंग प्रमाणपत्राच्या मूळ प्रतीच्या मागील बाजूस ‘अपंग-अव्यंग विवाह प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलेले आहे’ असा शिक्का मारण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांकडे या लाभार्थ्यांची माहिती नोंदवहीत ठेवली जाणार आहे. अपंगांच्या सामाजिक सुरक्षिततेचा एक भाग म्हणून ही योजना सामाजिक न्याय विभागामार्फत राबविली जाणार आहे.